मुंबई : एअर कमांडर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी आपली मुलगी अनन्या शर्मा (Ananya Sharma) सोबत फायटर जेट उडविलं. भारतीय वायूसेनेत अशी घटना पहिल्यांदा घडली. फायटर जेट वडील व मुलीनं सोबत उडविलं. वायुसेनेच्या इतिहासात असा क्षण पहिल्यांदा आला. वायूसेनेत उड्डाण करणारी वडील व मुलीची ही पहिली जोडी ठरली. फ्लाईंग ऑफिसर अनन्यानं भारतीय वायू सेना स्टेशन बीदरमध्ये हॉक -132 विमानाचं इनफार्मेशन उड्डाण भरली. याठिकाणी अनन्या लढावू विमानात पदवी (Degree) प्राप्त करण्यापूर्वी प्रशिक्षण घेत होती. वायूसेनेत असा प्रसंग यापूर्वी कधी आला नव्हता. फायटर जेट विमान वडील व मुलीनं चालविलं.
Father-daughter duo, Flying Officer Ananya & Air Commodore Sanjay Sharma,created history on May 30 when they flew in same formation of Hawk-132 aircraft at IAF Station Bidar,where Flying Officer Ananya is undergoing her training before she graduates onto superior fighter aircraft pic.twitter.com/dUW4zCmc9V
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 5, 2022
इंटरनेटवर हा फोटो व्हायरल झाला. ज्यात वडील व मुलीनं मिळून विमानाचं उड्डाण भरलं. एअर कमांडर संजय शर्मा आणि मुलगी अनन्या शर्मा यांनी कर्नाटकाच्या बिदार येथे हॉक -132 विमानाचं उड्डाण भरलं. ही घटना 30 मे रोजी घडली. आयएएफनं प्रेस रिलीज केली. त्यानुसार, वडील आणि मुलीनं सोबत विमान उड्डाण पहिल्यांदा केल्याचं सांगितलंय. फोटोत एअर कमांडर शर्मा आणि त्यांच्या मुलीचं छायाचित्र विमानासमोर आहेत. त्या विमानाचं उड्डाण भरण्यासाठी ते सज्ज असल्याचं दिसतं.
AIR COMMODORE SANJAY SHARMA and his daughter ANANYA SHARMA became the first father-daughter pair in the #IndianAirForce to fly in formation of the Hawk AJT in Bidar.
GLORIOUS PAST PROMISING FUTURE @IAF_MCC pic.twitter.com/HCpAKSmGv3
— Vikas Manhas (@37VManhas) July 5, 2022
ट्वीटरवर हा फोटो हीट ठरला. हा फोटो प्रेरणा देणारा आहे. सेवानिवृत्त एअर मार्शल पी. के. रॉय यांनी या अचिव्हमेंटचं कौतुक केलंय. अशाप्रकारंचं दृष्य यापुंढ दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संजय शर्मा हे भारतीय वायूसेनेत 1989 पासून कार्यरत आहेत. फ्रंटलाईन फायटर स्टेशन म्हणूनही त्यांनी काम केलंय. मीग 21 चं फायटर ऑपरेशनही त्यांनी केलंय. अनन्या शर्मा या डिसेंबर 2021 पासून प्रशिक्षण घेत आहेत. फायटर वैमानिक म्हणून मुलींना सेवेत घेण्यात येणार आहे. अनन्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलंय.