बंगलुरू : त्याने मोबाईल एपवरून त्याच्या वृद्ध पालकांचा सांभाळ करण्यासाठी एका मेडची नियुक्ती केली, परंतू तिचे वय पाहून त्याची नियत फिरली. त्याने तिच्यावर अत्याचार करीत तिला घरात कोंडून ठेवली. शेवटी एक दिवस तिने धाडस करीत स्वतची सुटका करीत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर बलात्काराच्या आरोपाखाली बंगलुरूच्या या इसमास अटक करण्यात आली आहे.
बंगलुरू येथे राहणाऱ्या आणि एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या पराशिवा मुर्ती ( वय 47 ) याने विल्सन गार्डन ऑफीस येथून ‘बुक माय बाई’ या मोबाईल एपवरून त्याने आपल्या वृद्ध आई-वडीलांच्या सेवेसाठी एका महिला अरटेकरला कामावर नियुक्त केले.
ही तरूणी 21 वर्षांची असल्याने तिला पाहून त्याची नियत फिरली. त्याने तिच्यावर बलात्कार करीत तिला कोणाला जर सांगितलेस तर जीवे मारण्याची धमकी दिली. आणि त्याने तिला घरात कोंडून तो कामाला निघून गेला. त्यानंतर या तरूणीने फोन करीत आपल्या कंपनीला घडलेला प्रकार सांगितला. कंपनीने याबाबत लागलीच पोलीसांना तक्रार करताच या पराशिवा मुर्तीला अटक केली आहे.