मुंबई: पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी चालली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणाचे सर्व पुरावे केंद्रीय गृहसचिवांना का दिले याची माहितीच त्यांनी मीडियाला दिली. राज्य सरकारने (maharashtra government) हा अहवाल सहा महिने दाबून ठेवला होता. त्यामुळे या प्रकरणाचे पुरावे राज्य सरकारला देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शिवाय यात आयपीएस अधिकाऱ्यांची नावे होती. त्यामुळे त्यांची ऑथेरिटी असलेल्या केंद्रीय गृहसचिवांकडे (Union Home Secretary) मी हा अहवाल सादर केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच मला आरोप किंवी सहआरोपी कसं बनवता येईल या दृष्टीनेच प्रश्न विचारल्या गेल्याचा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.
मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. मी दिलेलं पत्रं दाखवलं. पेनड्राईव्ह मी कुणालाही देणार नाही ही कागदपत्रं सेन्सिबल आहेत हे मी सांगितलं. सरकारला मी हे पुरावे दिले नाही. आयपीएस अधिकाऱ्यांची नावे असल्याने मी केंद्रीय सचिवांना हे पुरावे दिले. मी पत्रकार परिषद घेतली. पण कुणालाही कागदपत्रं दिली नाहीत. मी पब्लिक डोमेनमध्ये ही कागदपत्रं आणली नाहीत. सिक्रसीचा भंग कोणी केला असेल तर तो नवाब मलिकांनी केला. नवाब मलिक यांनी माझ्या पीसीनंतर लगेच पत्रकारांशी संवाद साधला आणि पत्रकारांना कागदपत्रे दिली. त्यामुळे चौकशीच करायची असेल तर ती नवाब मलिकांची केली पाहिजे. मलिकांना प्रेसला कागदपत्रं देण्याचा अधिकार होता का? पण त्यांनी कागदपत्रं दिले. मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला. तरी मला ते गोवू शकत नाही. मी सर्व काळे कारनामे बाहेर काढणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. माझ्या कितीही चौकश्या केल्या तरी सरकारला काही हाती लागणार नाही. उलट त्यांचे मनसूभे पूर्ण होऊ शकणार नाही, असंही ते म्हणाले.
मला पोलिसांनी प्रश्नावली दिली होती. मी उत्तर देणार असल्याचं सांगितलं. काल त्यांनी हजर राहण्याची नोटीस पाठवली. मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी कालच सांगितलं मी जाणार आहे. मग सरकार आणि पोलिसांकडून विनंती केली आम्ही आपल्याकडे चौकशीसाठी येतो. आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आले, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
VIDEO: फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटील
बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत, हसन मुश्रीफांची जोरदार फटकेबाजी