मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : ‘मी पुन्हा येईल’ या व्हिडिओने राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडून दिली. तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा सवाल विचारण्यात आला. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर झाला आणि नंतर काही वेळातच डिलिट पण करण्यात आला. त्यामुळे हा सहकारी पक्षांना निवडणुकीपूर्वीचा इशारा तर नव्हता ना, अशी शंका घेण्यास मोठा वाव मिळाला. या व्हिडिओतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर इशारा देण्यात आला नाही ना? सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही? हे सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करेल का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी असं मनमोकळं केलं.
सोशल मीडियावर असे कंटेट येतातच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर TV9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ते म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की एवढी बौद्धिक दिवाळखोरी का असावी. लोक सातत्याने कंटेट शेअर करत असतात. सोशल मीडियाचे एटिकेट सुरू झाली आहे, सोशल मीडियावर असे कंटेट येत असतात. सोशल मीडियावर जुने कंटेट शेअर करावे लागतात. तशा प्रकारे तो शेअर केला गेला. तो शेअर करण्याची गरज नव्हती. ज्यांनी केलं. त्याच्यापैकी ज्यांना कळत नाही त्यांनी शेअर केला. कुणाला सत्तेवर यायचे असेल तर तो अशा प्रकारे येतो का. असा अनाऊंसमेंट करून येतो का? असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निवडणुका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात महायुती सत्तेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांची पूर्ण टर्म ते पूर्ण करतील. एकही दिवस नाही. पूर्ण टर्म पूर्ण करतील. त्यांच्याच नेतृत्वात ही महायुती ते मुख्यमंत्री असतानाच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि आम्ही निवडणूक जिंकू. त्यामुळे याप्रकरणात कुणी शंका घेण्याचं कारणच नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. या व्हिडिओचा वेगळा अर्थ काढला गेला. मला तर याबाबत माहीतच नव्हतं. मला कुणी तरी येऊन सांगितलं. मी म्हटलं डिलीट करा, असं मतं त्यांनी मांडलं.
मुख्यमंत्र्यांकडून दबाव आला का?
मुख्यमंत्री परिपक्व आहे. त्यांना राजकीय परिस्थिती आहे. आमचा संवाद चांगला आहे. अशा एका व्हिडीओमुळे ते डिस्टर्ब होतील आणि फोन करतील एवढे अपरिपक्व ते नाही. ते अतिशय परिपक्व आहे. काही लोकांनी जाणीवपूर्वक खेळ करण्याचा प्रयत्न केला. ज्या विषयात काहीच नाही ते विषय चालू द्यावेत अशी राजकीय परिस्थिती नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
अजितदादा, एकनाथ शिंदे यांना इशारा?
या व्हिडिओतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना इशारा दिला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर इशारा व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. इशारा देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. इशारा देण्याची गरजच काय आहे. सरकार चांगलं चाललं आहे. आम्ही सरकार सर्व समाधानी आहोत. आमच्यापुढे सरकार म्हणून आव्हानं खूप आहेत. त्या आव्हानांचा आम्ही सामना करत आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत कुणाला इशारा देण्याची गरज नाही. नीट चाललं आहे. शंभर टक्के अलबेल आहे. तीन पक्ष एकत्र सरकार चालवतात तेव्हा अडचणी असतात. मतमतांतरे असतात. पण आज तरी या मतमतांतरामुळे आम्ही दूर होऊ आमच्यात भांडणं होतील अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.