लोकल सुरू करण्याबाबत दोन आठवड्यांपासून चर्चा, दोन दिवसात निर्णय कळेल; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

| Updated on: Aug 06, 2021 | 2:09 PM

लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल. (aaditya thackeray inaugurates mithi river project in mumbai)

लोकल सुरू करण्याबाबत दोन आठवड्यांपासून चर्चा, दोन दिवसात निर्णय कळेल; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
aaditya thackeray
Follow us on

मुंबई: लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल, असं मोठं विधान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (aaditya thackeray inaugurates mithi river project in mumbai)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मिठी नदी स्वच्छता प्रकल्पाचं आज उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी म्हणून भाजप नेत्यांनी जोरदार आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना लोकल सुरू करण्याबाबत विचारण्यात आलं. लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल. दोन डोस घेतलेल्यांना केवल लोकलच नाही तर इतर गोष्टीतही सूट देण्यात येऊ शकते. याबाबत काळजीपूर्वक चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं आदित्य म्हणाले.

जीव वाचवणं महत्त्वाचं

इतर देशात कोरोनाची संख्या वाढत आहे. आपल्याकडेही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसरी लाट येऊन रुग्णालये भरू नयेत. लोकांना कोरोना होऊ नये याची खबरदारी घेत आहोत, असं सांगतानाच आंदोलन जरूर करावं, पण ही कारणेही समजून घेतली पाहिजे. यात राजकारण करू नये. लोकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

त्या भेटीवर बोलायचं नाही

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलण्यास नकार दिला. मला या राजकीय बाबींवर बोलायचं नाही. महाविकास आघाडी सरकार आपलं काम करत आहे. महापालिका, एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास कामांवर जोर देण्यावर आमचा भर आहे, असं ते म्हणाले.

पूर आला की पहिली भीती आम्हाला वाटते

आज एक महत्त्वाचा क्षण आहे. आपण मिठी नदीचं महत्त्व 2005 पासून समजू लागलो. तेव्हापासून आम्ही मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहोत. पूर आला की आम्हाला पहिली वाटते. कारण आम्ही नदीच्या जवळ राहतो. मिठी नदीचा विषय सोडवणं तेवढं सोप्प काम नाही. मिठी नदीच खोलीकरण आणि रुंदीकरण आम्ही करत आहोत. आणखी काम बाकी आहे. आता जे मशीन बसवण्यात आले आहे, त्या मशीनच्या माध्यमातून आजूबाजूच्या गटारातून येणाऱ्या कचऱ्याचं विभाजन करण्याचं काम होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

नदीत कचरा टाकू नका

पॅकेज 3चं काम हाती घेतलं आहे. 2007ची सॅटेलाईट इमेज पहिली आणि आत्ताची पाहिली की फरक हा नक्कीच जाणवत आहे. नागरिकांना आवाहन आहे की, नदीमध्ये अशा प्रकारे कचरा टाकू नये. तरच नदी पुनर्जीवित होईल, असंही त्यांनी सांगितलं. ओशिवरा, पोयसर नदी पुनर्जीवत करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (aaditya thackeray inaugurates mithi river project in mumbai)

 

संबंधित बातम्या:

राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच आहे; बाळा नांदगावकरांनी दिले युतीचे संकेत

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

(aaditya thackeray inaugurates mithi river project in mumbai)