माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही, आमचं हिंदु्तव चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना, मविआ सरकार असताना गिरीश महाजनांना अटकेचा प्रयत्न झाला का यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, अटकेची भीती कशासाठी होती. काही चुकीचं केलं असेल ना. एवढं घाबरण्याचं कारण काय होतं. आमचं तर भाजपच्या सरकार सारखं नव्हतं ना, कुणालाही अटक करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर शिदेंवर निशाणा साधताना, मिंधेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे मिंधे यांनी आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
युतीत आम्ही दोनदा फसलो. 2014 ला त्यांनी युती तोडली. जी लोकं धर्माच्या नावावर घरे जाळता, लोकांना मारता, दहा वर्षात या देशात एक तरी शाश्वत विकासाची गोष्ट दाखवा. स्वतच्या पक्षाची केली नाही. स्मार्ट सिटीचं काय झालं. स्वच्छ भारतचं काय झालं, नोटबंदी, आधारचं काय झालं. एकही कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. भाजप देशाला आणि महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहे. महाराजांच्या पुतळ्यात जी भाजप भ्रष्टाचार करू शकते त्यांच्यासोबत युती करणार का ? आम्हाला नकली संतान म्हणाले. पवारांना भटकती आत्मा म्हणते, त्यांच्याशी युती कशी होईल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.