तिकडे हिंदुंवर अत्याचार होत असतील तर भारत-बांगलादेश सामना कशासाठी? आदित्य ठाकरेंचा भाजपसह BCCI ला सवाल

| Updated on: Sep 18, 2024 | 6:18 PM

भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेला सुरूवात होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. कसोटी मालिकेवरून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी भाजपसह बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

तिकडे हिंदुंवर अत्याचार होत असतील तर भारत-बांगलादेश सामना कशासाठी? आदित्य ठाकरेंचा भाजपसह BCCI ला सवाल
Follow us on

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. कसोटी मालिका सुरू होण्याआधी वादात सापडली आहे. बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत असल्याचं बातम्यांमधून समजत आहे. हिंदुवर अत्याचार तिकडे होत असतील तर भारत आणि बांगलादेश कसोटी सामने का घेतले जात आहेत? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

भारत विरुद्ध बांगलादेश सिरीज सुरु होतेय. अनेकांनी मला फोन केले भाजपच्या नेत्यांनी फोन केले. हा खेळ झाला पाहिजे नको यात मला जायचं नाही पण मला परराष्ट्र मंत्रालयातुन माहिती हवीय की बांगलादेश मध्ये काय परिस्थिती होती हे सांगावं. व्हॉटसअप किंवा बातम्या अनेक पाहिल्या. हिंदुवर अत्याचार होतोय असं सर्वत्र दाखवलं जातंय. केंद्र सरकार भाजपचे, BCCI भाजपची, तीच BCCI देशात टेस्ट घेतायत. मग आता हिंदुत्व कुठे गेले? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपचे नेते पण या संबंधित विचाराधीन आहेत कि आपण काय बोलायचं? परराष्ट्र मंत्रालयाकडून मला माहिती हवी आहे कि दोन महिन्यात परिस्थिती काय होती? परराष्ट्र मंत्रालयाकडून मला माहिती हवी आहे कि दोन महिन्यात परिस्थिती काय होती? मी भूमिका नाही तर परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती हवी आहे? खरच हिंदुवर अत्याचार तिकडे झाले आहेत का? याची माहिती द्यावी जर अत्याचार होत असतील तर सामने का घेतले जात आहेत? असा सवासही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

निवडणूक घेण्याची हिंमत नाही आणि ते आता वन नेशन वन इलेक्शनची बात करतात. ते चार राज्यांची निवडणूक घेता येत नाही. 30 शहरांत निवडणुका घेत येत नाही. कपिल शर्मा कॉमेड शो सारखे हे झालंय. हरायचेच नाही म्हणून निवडणुका घ्यायचेच नाहीत त्यांना असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.