मुंबईः आरे (Aarey) वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे आंदोलन करत आहेत हे आम्हाला गंमतीशीर वाटतं. ठाकरे सरकारने कारशेड कांजूरमार्गला हलवण्यासाठी ठोस काहीही न करून मुंबईकरांना मुर्ख बनवले आहे, हे विसरून चालणार नाही संधी असताना आरेचे जंगल का वाचवले नाही, याचे उत्तर आदित्य ठाकरेंनीही द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी यांनी दिली. मुंबई आम आदमी पार्टीने (Aam Adami Party Mumbai)आरे वाचवण्यकरिता नवीन वेबसाईट(Website) सुरू केली आहे. या वेबसाईटच्या आधारे सामान्य जनता मुख्यमंत्री यांना आरे वाचावण्याकरिता साद घालणार आहेत.
The Aam Aadmi Party today launched its latest website-based campaign to #SaveAareyForest: https://t.co/FD3JPxxxCH. This allows Mumbaikars to send a personalized email appeal to save ‘Aarey Forest’ directly to the Chief Minister of Maharashtra’s inbox. pic.twitter.com/Ne88BJUkGG
— AAP Mumbai (@AAPMumbai) July 15, 2022
आम आदमी पार्टीने मुंबईतील फोर्ट ऑफिस येथे या संदर्भात पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना रुबेन मस्करेन्हास यांनी सांगितले की शिंदे-फडणवीस सरकार आणि त्याचा अहवाल देणाऱ्या विविध संस्था आरे जंगलातील प्रस्तावित कारशेडबाबत संभ्रम निर्माण करत असल्याने या मोहिमेचे महत्त्व आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेतून यू-टर्न घेतला तेव्हा मुंबईकर आश्चर्यचकित झाले, जिथे त्यांनी आरे वाचाण्याकरिता मेट्रो 6 करशेड आणि मेट्रो 3 कारशेड कांजूरमार्ग येथे एकत्र करणे पसंत केले. पण आता मुख्यमंत्री पदी आल्यानंतर मुंबईचे फुफ्फुस असणारे आरे ते संपवायला निघाले असल्याची टीका रूबेन यांनी केली.
हे वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईट संदर्भात बोलताना रुबेन मस्करेन्हास यांनी सांगितले की, आरे जंगल वाचवण्यासाठी LetMumbaiBreathe.com. या मोहिमेमुळे मुंबईकरांना एका क्लिकवर थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इनबॉक्समध्ये आरे वन वाचवण्यासाठी वैयक्तिकृत ईमेल पाठवता येणार आहे. मेट्रो 3 कारशेड हलवून कांजूरमार्ग येथील मेट्रो 6 कारशेडशी जोडण्याची विनंती करणारे पत्र सामायिक केले आहे. वेबसाइट वापरकर्त्यांना त्यांच्या ईमेल आयडीवरून एका बटणावर क्लिक करून हा ईमेल पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरे बचाओ आंदोलनाला व्यापक जनसमर्थन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना सोप्या स्वयंचलित पद्धतीने सांगण्यासाठी मुंबईकरांना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे अभियान एक शक्तिशाली माध्यम आहे, असे मत रुबेन मस्करेन्हास यांनी व्यक्त केले.
आरेचे जंगल नष्ट करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक पक्षाचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेस सरकारने सर्वप्रथम विनाशाला सुरुवात केली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने जंगल वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईतील तरुण आणि पर्यावरणवाद्यांना निर्दयीपणे दडपून टाकले. ठाकरे सरकारने सर्व काही केले. आश्वासने दिली पण अडथळे काढून 33 हेक्टर जमीन पूर्ववत केली नाही. कांजूरमार्ग जागेचे काम सुरू करण्यात आलेले अडथळे दूर करण्यात त्यांचे सरकार कोर्टात योग्य ती बाजू मांडण्यातही अपयशी ठरले. आता फडणवीस सरकारमध्येही आरे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे, असा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी केला.
आरेचे जंगल वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी नेहमीच मुंबईकरांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मुंबईच्या हिरव्या फुफ्फुसांचे, त्यातील वन्यजीवांचे रक्षण करण्याचा हा लढा आहे. शहरातील पूरस्थिती रोखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 27 आदिवासी पाड्यांचे रक्षण करण्यासाठी हा लढा आहे, असे मत आम आदमी पक्षाचे सहसचिव आदित्य पॉल यांनी व्यक्त केले.