मुंबईः शिंदे-फडणवीस गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. अब्दुल सत्तारांचा यावेळी जीभ घसरल्याने राजकीय नेत्यांसह अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या की, अब्दुल सत्तार महाराष्ट्रातून तू कुठून निवडून येतोस ते बघतोच म्हणत त्यांनी त्यांना जाहीर आवाहनही दिलं आहे. यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
विद्याताई चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना जोरदार हल्लाबोल चढविला. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, हा महाराष्ट्र जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचा हा महाराष्ट्र आहे.
त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा एका महिलेवर टाका केल्या नंतर त्याचे काय परिणाम होतात ते तुम्ही बघाच. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, तुम्हाला लाज, शरम असेल तर एका महिला लोकप्रतिनिधी बद्दल असं वक्तव्य केलं जात असेल तर अब्दुल सत्तार यांचा आधी राजीनामा घ्या अशी त्यांनी यावेळी मागीणीही केली.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आणि कार्यकर्त्या महिलांकडून अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली जात आहे. अब्दुल सत्तार, रवींद्र चव्हाण यांच्यावरही विद्याताई चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी यशोमती ठाकूर यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. महिला लोकप्रतिनिधीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असेल तर त्यांचा आधी राजीनामा घ्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.