मुंबईः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि अभिजित बिचकुले यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यामुळे आता काळे आणि राऊत-बिचुकले हा वाद प्रचंड टोकाल गेला आहे. संजय राऊत आणि अभिजित बिचुकले हे दोघेही हे दोघेही गांजा ओढतात आणि बोलतात अशी टीका गजानन काळे यांनी राऊत आणि बिचुकले या दोघांवर केली होती.
त्यावर पलटवार करत अभिजित बिचुकले यानी गजानन काळे यांना मुंबईत येऊन तुला फरफटत नेऊन राज ठाकरे यांच्यासमोर तुझं कानफाड फोडीन असा सज्जड दम अभिजित बिचुकले यांनी दिला आहे.
त्यामुळे या वादाला आता नव्याने तोंड फुटले आहे. संजय राऊत आणि अभिजित बिचुकले हे दोघंही गांजा ओढून बोलताता अशी टीका गजानन काळे यांनी केली होती.
त्यावर अभिजित बिचुकले यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी गजानन काळे यांच्यावर टीका करताना त्यांनी गजानन काळे नाही तर आजपासून त्याचं नाव गांज्या काळे आहे अशी जोरदार टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गजानन काळे यांनी अभिजीत बिचुकले आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे आज अभिजित बिचुकले यांनी गजानन काळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
गजानन काळे यांनी राऊत आणि बिचुकले हे दोघंही गांजा ओढून बोलतात अशी टीका केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळेच बिचुकले यांनी हा तर गांज्या काळे म्हणून प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या गजानन काळे हा नालायक माणूस असल्याचे सांगत त्यांनी त्यांची लायकी काढली आहे. तर राज ठाकरे हा तर माझा भाऊ आहे पण संजय राऊत आणि तुमचं वैर असेल पण मला का मध्ये ओढता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
गजनान काळे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांची औकातही विचारली आहे. ते म्हणाले की, तुझ्या 700 पिढ्यांना तरी माहिती आहे का, अभिजीत बिचुकलेची औकात काय आहे.
त्यामुळे आपल्यावर टीका केली तर मुंबईत येऊन तुला फरपटत नेऊन राज ठाकरे यांच्या समोर तुझं कानफाड फोडीन असा दम अभिजित बिचुकले यांच्याकडून गजानन काळे यांना देण्यात आला आहे.
त्यांच्या या टीकेनंतर त्यांच्यावर त्यांनी जातीयवादाचीही टीका केली आहे. तर संजय राऊतयांच्या चप्पलजवळही उभा राहण्याची तुझी लायकी नाही असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे.