मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी मोदी सरकारला अहंकार झाला आहे. आझमी यांनी नरेंद्र मोदीजी तुम्ही देश विकायला आला आहात, अशी टीका केली देशातील भोळ्या जनतेला फसवत आहात. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचं नाही त्यांना कामगारांचाही पाठिंबा आहे. शेतकरी थंडीच्या वातावरणात दिल्लीत बसले आहेत. शेकडो शेतकरी शहीद झाले, मात्र, केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांना चीनचा, खलिस्तान्याचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार केला जात आहे. स्वातंत्र्याची लढाई पंजाबमधून सुरु झाली होती, शेतकरी माघार घेणार नाहीत.केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घ्यावेत, असं अबू आझमी म्हणाले. ते मुंबईतील आझाद मैदानातील संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या सभेत बोलत होते (Abu Azami criticized Narendra Modi Government over Farm Laws)
अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून डाळ, तांदूळ काढण्यात आले.बाजारातून सर्व धान्य विकत घेतले जाईल. देशातील जनतेला अन्न मिळणार नाही. देशात 75 टक्के शेतकरी आहेत. त्यांनी पीक घेतलं नाही तर मुंबई आणि दिल्लीतील बंगल्यात राहणारे लोक उपाशी राहतील. मुंबई दिल्लीतील बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तींनी लक्षात ठेवावं जर शेतकऱ्यांनी पीक घेणं बंद केल्यास तुम्ही काय खाणार?, असा सवाल अबू आझमी यांनी केला. गायीची पूजा केली जाते तशी शेतकऱ्यांची पूजा केली पाहिजे, असं अबू आझमी म्हणाले.
मोदीजी कायदे मागे घ्या…
भारत हा शेतीप्रधान देश आहे. मोदीजी तीन कायदे मागे घ्या, शेतकऱ्यांना हमीभाव द्या, असं आवाहन आझमी यांनी केले. सर्व पक्ष एकत्र आल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. ज्यांच्या सत्तेवरील सत्तेचा सूर्य मावळणार नाही, असं म्हटलं जायचं त्यांच्यासमोर पंजाबचा शेतकरी झुकला नाही. तर, त्यांच्या पुढे मोदी सरकार किरकोळ आहे, असं अबू आझमी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी कायदे रद्द करावेत, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.
अजित नवलेंचा राजभवनावर शेतकऱ्यांसह जाण्याचा निर्धार
अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची देखील आहे. राज्याच्या राज्यपालांकडे जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. शेतकरी त्यांचं म्हणनं राज्यपालांकडे जायचं आहे. राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देऊ, असं अजित नवले म्हणाले. आझाद मैदानावर जमलेले सर्व शेतकरी राजभवनाकडे जाणार आहोत. ज्या ठिकाणी अडवलं जाईल तिथे आम्ही थांबून आंदोलन करु, असा इशारा अजित नवले यांनी दिला.
आम्ही राज्यात कृषी कायद्यांची अंमलबजावणी करत नाही : अजित पवार https://t.co/WrjpOQjtB6#FarmersProstests | #AzadMaidan | #MumbaiFarmerProtest pic.twitter.com/OYAe2mM2md
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
संबंधित बातम्या:
25 हजार पुलाव पॅकेट, केळी, डाळ आणि चपाती, शेतकरी मोर्चासाठी दादरच्या गुरुद्वाराची शिदोरी
(Abu Azami criticized Narendra Modi Government over Farm Laws)