मुंबई : परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीला (Indian Agencies) मोठं यश आलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटाचील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकला (Most Wanted terrorist Abu Bakar) यूएईतून अटक करण्यात आली आहे. 1993 साली मुंबईतील (1993 Mumbai Serial Bomb Blast) वेगवेगळ्या ठिकाणी 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल 257 लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर 700 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तब्बल 29 वर्षानंतर अबू बकर नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याचं वृत्त इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलं आहे. अबू बकर हा पाकव्याप्त काश्मिरात शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचं प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होतं. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्सचं लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर एका मोठ्या ऑपरेशननंतर अबू बकरला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आलं असल्याचं वृत्त हाती येतंय.
1993च्या बॉम्बस्फोटाचा अबू बकर हा मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीनुसार त्याला नुकतच पकडण्यात आल्याचं कळतंय. 2019मध्ये खरंतर बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून लवकरच भारतात आणलं जाणार असल्याचं वृत्त हाती येतंय. इंडिया टुडेच्या सूत्रांनी याबाबतचं वृत्त दिलं असून भारतीय यंत्रणांच्या कामगिरीला मोठं यश आलं असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
अबू बकर यांचं पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. अबू हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्यानं आखाती देशांमधून सोनं, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे. 1997 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. अबूनं दुबईतीलच एका इराणी मुलीशी लग्न केलंय. अबू बकरचे दुबईतील अनेक व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचंही सांगितलं जातं. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांची जीव गेला होता. तर 713 गंभीरीत्या जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील एकूण 27 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. संपूर्ण देश 1993 मधील बॉम्बब्लास्टच्या घटनेनं हादरुन गेला होता. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट सुनियोजितपणे आखला गेला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इशारा मिळाल्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी सर्वप्रथम लोकांची निवड करण्यात आली होती. या सगळ्यांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तस्करीचे जाळे वापरून दाऊदने अरबी समुद्रमार्गे स्फोटके मुंबईत पोहोचवली होती. मुंबईतील विविध भागात सुमारे दोन तास हे स्फोट सुरू होते. या घटनेनं संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती.
12 मार्च 1993 ला मुंबईत नेमकं काय घडलं? स्फोटाची मालिका कशी?