AC local : आजपासून एसी रेल्वेचे तिकीट स्वस्त, जाणून घ्या आजपासून लागू झालेले नवे दर

| Updated on: May 05, 2022 | 1:00 PM

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 29 एप्रिल रोजी मुंबई एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात केल्याची घोषणा केली होती. फर्स्ट क्लास आणि एसी लोकलचे सिंगल-जर्नी तिकीट भाडे आज पासून स्वस्त होणार आहे.

AC local : आजपासून एसी रेल्वेचे तिकीट स्वस्त, जाणून घ्या आजपासून लागू झालेले नवे दर
एसी लोकल
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई – मध्य, तसेच पश्चिम उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा (AC local) प्रवास गुरुवारी 5 मे पासून स्वस्त होणार आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट (Ac local Ticket) दरात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. शिवाय सामान्य लोकलच्या विनावातानुकूलित लोकल प्रथम श्रेणीचेही भाडेदर कमी करण्यात आले आहेत. मात्र वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीच्या पास (First Class Pass) दरात मात्र बदल करण्यात आलेला नाही.

एसीचा तिकीट दर पन्नास टक्के कमी

आजपासून तुम्हाला एसी लोकलचा प्रवास कमी पैशात करता येणार आहे. एसी लोकलचा दरभाडे अधिक असल्याने त्या लोकलमधून अनेकजण प्रवास करीत नव्हते. तसेच अधिक दर असल्याची तक्रार देखील केंद्रीय मंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी भायखला येथे तिकीटाचा दर कमी करण्याची घोषणा केली होती. आजपासून एसीचा तिकीट दर पन्नास टक्के कमी करण्यात आला आहे. प्रथम श्रेणीच्या पास दरात मात्र बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजपासून एसी लोकलला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती घोषणा

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 29 एप्रिल रोजी मुंबई एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात केल्याची घोषणा केली होती. फर्स्ट क्लास आणि एसी लोकलचे सिंगल-जर्नी तिकीट भाडे आज पासून स्वस्त होणार आहे. एसी आणि नॉन-एसी फर्स्ट क्लाससाठी सुधारित भाडे आजपासून लागू होणार आहे. रोजच्या प्रवाशांनी तिकीट दर कमी करण्याची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 किमी अंतरासाठी सध्याचे 65 रुपये असलेले किमान भाडे 30 रुपये करण्यात आले आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकल गाड्यांचे भाडे कमी करण्याची जनतेची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागणी असल्याचे सुध्दा रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते.