मुंबई : राज लक्ष्मी यांना सकाळी फिरायची सवय. त्यामुळे त्या रोजसारख्या आजही सकाळी बाहेर पडल्या. फिरून शुद्ध ऑक्सिजन घेऊ. वॉक केल्याने दिवस बरा जातो. अशी त्यांची समज. म्हणून सकाळीच फिरायला गेल्या. पण, आजचा दिवस हा शेवटचा असेल, याची कल्पना त्यांनी केली नव्हती. रस्त्याने जात असताना अचानक अपघात झाला. कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचा अपघात एवढा भीषण होता की, कार चक्काचूर झाली. कार डिव्हायडरला आदळली.
रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा वरळी डेरी परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. महिलेला मॉर्निंग वॉक करत असताना उत्तर वाहिनीवर भरधाव गाडीने धडक दिली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज लक्ष्मी असं महिलेचं नाव सांगितलं जातंय. सध्या वरळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमकं या घटनेमागे कारण काय आहे ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
कार भरधाव वेगात होती. त्यामुळे चालकाने नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली. त्यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले. कार चक्काचूर झाली. या अपघातात राज लक्ष्मी यांना कारने धडक दिली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आता अपघात कसा झाला, याची चौकशी करतील. वरळी पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
राज लक्ष्मी या नेहमीप्रमाणे घराबाहेर पडल्या. आजचा दिवस हा आपल्यासाठी शेवटचा असेल, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. पण, कार त्यांचा काळ बनून आली. कारने धडक दिली. यात त्यांचा मृ्त्यू झाला. वरळी पोलीस घटनेचा तपास करत आहेत. कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतक महिलेल्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवाल आल्यानंतर मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल.