सरकारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार राजीनामा द्यावा लागतो, रामदास आठवले यांची माहिती

| Updated on: Oct 12, 2022 | 9:57 PM

राजीनामा नियमानुसार आधी द्यावा लागतो.

सरकारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार राजीनामा द्यावा लागतो, रामदास आठवले यांची माहिती
रामदास आठवले यांना विश्वास
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं यशवंतराव प्रतिष्ठान येथे प्रेझेंटेशन आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना, भारत सरकारच्या योजनांसंबंधी माहिती दिली जात आहे. अशी शिबिरं विभागीय स्तरावर देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. गरिबांना मदत होत असते.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप, शिंदे गटाचा उमेदवार आहे. या भाजपच्या उमेदवाराला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे.

उद्धव ठाकरे यांची मशाली पेटवलेली दाखविण्यात आली आहे. पण, या निवडणुकीमध्ये ही मशाल विझविण्याचं काम करणार आहोत. भाजपचं कमळं फुलंवायचं आहे. रिपब्लिकन पक्ष भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे.

या निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. कारण एकनाथ शिंदे, भाजप आणि रिपाई एकत्र आलेली आहे. ही महायुती झाली आहे.

ऋतुजा लटके यांना ठाकरेंनी उमेदवारी देऊ केली आहे. पण, ऋतुजा यांनी राजीनामा दिला. तो मनपा प्रशासनानं स्वीकारलेला नाही. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, राजीनामा नियमानुसार आधी द्यावा लागतो.

याच्याशी सरकारचा काही संबंध नाही. हा प्रश्न अधिकारी स्तरावरचा आहे. यात सरकारचा दबाव आणण्याचा प्रश्न काही येत नाही, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना याबाबत भेटलो. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात यावर विचार करणार असल्याचं सांगितलं. आरपीआयला एक मंत्रिपद मिळावं, यासाठी मागणी केली आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.