मुंबई : भारतासह जगभरात आज वर्षातील दुसरे आणि शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. आज भारतात होणारे चंद्रग्रहण हे तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकता. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणचा एकत्रित दुर्मिळ योग तब्बल 149 वर्षांनी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज होणारे चंद्रग्रहण ही खगोल प्रेमींसाठी एक विशेष पर्वणी समजली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र्ग्रहणाचे वेध 9 तासापूर्वी म्हणजे 4 वाजून 31 मिनीटांनी लागण्यास सुरुवात होईल. हे ग्रहण काही ठरावीक राशींसाठी उत्तम मानले जात असून त्यांना या काळात धनलाभ, सोने खरेदी यासारखे फायदे होतील. तर काही राशींच्या व्यक्तींचे मात्र या कार्यकाळात नुकसान होणार असल्याचे संकेत ज्योतिषांनी वर्तवले आहेत.
ग्रहणाचा राशीवर होणारा परिणाम
मेष : या राशीसाठी आजचे ग्रहण संमिश्र लाभदायी असणार आहे. मानपान या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत न करता आजच्या दिवशी सर्वांशी मिळून मिसळून वागा. तसेच कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होऊन तुम्हाला लाभ मिळेल
वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण फार वाईट ठरणार आहे. कारण वृषभ राशीच्या व्यक्तींना ग्रहणाच्या काळात आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच या राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारीही जाणवू शकतात. त्याशिवाय अचानक तुम्हाला अस्वस्थ असल्यासारखेही वाटेल.
मिथुन : या राशीसाठी आज होणारे ग्रहण हे अतिशय लाभदायक ठरणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना आज अगदी सहजतेने वाहन कर्ज उपलब्ध होईल. तसेच तुमचा एखाद्या मित्राने उसने घेतलेले पैसही तो तुम्हाला आज परत करेल. विशेष म्हणजे या ग्रहणाच्या निमित्ताने प्रेमात किंवा लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंद द्विगुणीत होणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. तसेच कामाचे वर्चस्व वाढून तुमचे प्रमोशन होईल. विशेष म्हणजे अचानक तुम्हाला धनलाभही संभवतो.
सिंह : हे चंद्रग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काही प्रमाणात फलदायी असणार आहे. यामुळे तुमच्या आरोग्यवर परिणाम जाणवतील. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे
कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींनी ग्रहणाच्या काळात वायफळ खर्च करु नये. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच आज दिवसभर तुमचे मन दु:खी राहू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अनावश्यक गोष्टीही ऐकाव्या लागू शकतात.
तूळ : आज होणारे चंद्रग्रहण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फार फायदेशीर ठरणार आहे. या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात किंवा नोकरीत अचानक धनलाभ संभवतो. विशेष म्हणजे आज अचानक एखादा दूरचा मित्रही तुम्हाला भेटू शकतो.
वृश्चिक : या ग्रहण तुम्हाला संमिश्र स्वरुपाचा फायदा होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो, मात्र तुमचे खर्चावर नियंत्रण नसल्याने तुम्हाला पैशांची बचत करता येणार नाही. त्याशिवाय तुम्ही ठरवलेली काम वेळेत पूर्ण होतील.
धनू : आज होणारे चंद्रग्रहण धनू राशीतच होत असल्याने त्याचा संमिश्र फायदा या राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळणरा आहे. ग्रहणाच्या काळात या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात थोडी सतर्कता बाळगावी लागणार आहे. तसेच आज शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.
मकर : मकर राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहणामुळे आर्थिक फायदा होणार आहे. काही जुन्या घरगुती वादाही मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ग्रहणाच्या काळात स्वत: च्या तब्येतीची काळजी घ्या आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
कुंभ : हे चंद्रग्रहण कुंभ राशीसाठी अशुभ मानले जात आहे. त्यामुळे कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. तसेच घरातील वातावरणही सकारात्मक ठेवा. दरम्यान ग्रहणामुळे तुमचे नातेवाईकांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
मीन : मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज होणारे चंद्रग्रहण सर्वात लाभदायक ठरणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींना आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना आर्थिक लाभ प्राप्त होईल. तसेच सामाजिक आणि आर्थिक रुपातही तुम्हाला सन्मान मिळेल. त्याशिवाय आज कित्येक वर्षांनी तुमची एखाद्या जवळच्या व्यक्तीशी भेट होऊ शकेल.
(सूचना : राशीमध्ये व्यक्त करण्यात आलेली मतं तज्ज्ञांच्या माहितीवरुन देण्यात आली आहेत, ही टीव्ही 9 ची निर्मिती नाही.)