मुंबई : आयसीस (ISIS) संघटनेचा संशयित दहशतवादी म्हणून अटक करण्यात आलेल्या आरिफ माजिद याने जामीन मिळावा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय. त्याच्या अर्जावर आज (4 फेब्रुवारी) मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतर त्याच्या अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवलाय. 23 फेब्रुवारी रोजी कोर्ट या अर्जावर आपला निकाल देणार आहे (Accused of ISIS terrorist organization petition for Bail) .
आरिफ माजिद याचं प्रकरण खुप गाजलं होतं. कल्याण येथे राहणारे काही तरुण थेट आयसीस या दहशतवादी घनटनेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यात आरिफ माजिद हा देखील होता. मात्र, काही महिन्यांनी तो भारतात परतला. तो भारतात आल्यावर एनआयएने त्याला अटक केली आणि त्याच्यावर UAPA कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली.
यानंतर आरिफ याने मुंबई सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई सेशन कोर्टाने त्याचा जामीन अर्ज मान्य करत काही अटींवर त्याला जामीन दिला. मात्र, सेशन कोर्टाच्या या निकालाच्या विरोधात एनआयएने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्या निकालाला स्थगिती मिळवलीय. त्या विरोधात आरिफ माजिद हा आता हायकोर्टात आला आहे. आपल्याला सेशन कोर्टाने दिलेला जामिनावरील स्थगिती उठवावी आणि आपल्याला जामीन द्यावा अशी त्यांची मागणी आहे.
आरिफ माजिद हा स्वतःच युक्तिवाद करतो. आजही त्याने स्वतःच युक्तिवाद केला. कोर्टाला आपण निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. आपण शिक्षणासाठी तिकडे गेलो होतो. त्यानंतर वकिलामार्फत मी परतलो होतो. या बाबतचे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत. आपण आयसीसमध्ये जाण्यासाठी आपल्याला आयसीसच्या लोकांनी परवानगी दिल्याचं पत्र एनआयएनं सादर केलं आहे. पण ते पत्र माझ्या अटकेच्या एक महिन्यानंतरचं आहे. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी काही पुरावे कोर्टा समोर सादर केले. व्हिडिओ दाखवलेत. त्याच प्रमाणे आरिफ याला गोळी लागल्याचं देखील कोर्टाला सांगितलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
हेही वाचा :
ISISच्या 2 हजार दहशतवाद्यांचा भारतावर हल्ल्याचा कट! UNच्या रिपोर्टचा दावा
आयसीसचं भारतातील नेटवर्क उद्ध्वस्त, NIA च्या विशेष न्यायालयाकडून 15 जणांना शिक्षा
दिल्लीत पकडलेल्या संशयित अतिरेक्याच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा, वडिलांसह तिघांना अटक
व्हिडीओ पाहा :
Accused of ISIS terrorist organization petition for Bail