मुंबई, वाहतूक नियम मोडल्यानंतर खाजगी मोबाईलने (private mobile phone) गाडीचे फोटो काढणे यापुढे वाहतूक पोलिसांच्या (traffic police) अंगलट येऊ शकते. खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई (legal action) करण्यात येणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगल (Kulwant Sarangal) यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कायमच दबा धरून बसलेले असतात. वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन दिली गेली असताना देखील सर्रास खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले जातात. बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे कळतसुद्धा नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते. मात्र, आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.
याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. यापुढे वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चालान मशीनचाच वापर करावा लागणार आहे.
वाहतूक पोलिसांनी कारवाईच्या वेळी खाजगी मोबाईलचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असा आदेश कुलवंत सारंगल यांनी दिला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई- चालानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो. वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते. मात्र, आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.
अनेकदा वाहतूक पोलिस सिग्नल संपला किंवा वळण संपले की दबा धरून थांबलेले असतात. अनेकदा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि ते तो नियम दाखवून पावती फाडतात. तुमचे चालान चुकीने काढले गेले असेल तर, तुम्हाला अनेक स्तरांवर ते रद्द देखील करता येते.
वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिनमध्ये फोटो अपलोड करतात. तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाड़ी कोणती आहे ओळखणे कठीण होते. यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणे बंधनकारक असणार आहे.