मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन करुन 5 महिने झाले आहेत तरीही सुरत आणि गुवाहाटीवरुन टोलेबाजी काही थांबताना दिसत नाही. त्यामुळे विधानसभेतही आदित्य ठाकरे यांची टीकेची गाडी सुरतकडे गेली आणि त्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही मातोश्रीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे गटातील वाद आणखी चिघळणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत चर्चा महामार्गावरील सुरक्षा आणि रस्त्यांसंदर्भातबाबत सुरू होती. पण आदित्य ठाकरे यांनी आपल्या चर्चेची गाडी सुरत आणि गुवाहाटीच्या दिशेनं घेऊन गेले.
आदित्य ठाकरे यांनी सूरत-गुवाहाटीवरून टीका केल्यामुळे शिंदे गटाला त्यांनी डिवचल्यासारखं झाले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही शिल्लक सेना म्हणत त्यांना त्यांनी पुन्हा डिवचलं आहे.
त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलायला उभा राहिले होते, आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना विषय वाढवू नये असंही म्हटले होते.
यावेळी अजित पवार बोलायला उभा राहिल्यानं मंत्री गुलाबराव पाटील हेही उभे राहिले आणि आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देत मातोश्रीवरुन त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले होते. त्यावरुन ठाकरे गटाला संधी मिळेल तिथं शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विधानसभेतही आदित्य ठाकरे यांनीच तिच संधी साधली आणि शिंदे गटाला सुरत-गुवाहाटी दौऱ्यावरून जोरदार टीका केली.
शिंदे-फडणवीस सरकार येऊन काही महिने उलटून गेले तरीही सुरत-गुवाहाटीवरून होणारी टीका काही थांबायचे नाव घेईना. हिवाळी अधिवेशनातही गुवाहाटी दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल विरोधकांकडून केला जात असल्याने त्यांच्याकडूनही मातोश्रीवर निशाणा साधला जात आहे.