मुंबई हादरली! अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्र्यांचं नाव घेत म्हणाले…

| Updated on: Feb 08, 2024 | 9:49 PM

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये.

मुंबई हादरली! अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्र्यांचं नाव घेत म्हणाले...
Follow us on

मुंबई : कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आणखी एकदा मुंबई हादरली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला असून त्यानंतर हल्लेखोराने स्वत:वरहीच चार गोळ्या मारून घेतल्या आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमधील करूणा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

माजी नगरसेवक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. पाच वाजता मातोश्रीवर बैठक करून गेले. किती दिवस हे सहन करत बसायचं, महाराष्ट्र बदनाम होतच आहे. लोकांनाही भीती आहे मात्र अशा घटनांमुळे उद्याोग जगही महाराष्ट्रात येणार नाही. हे गुंडाराज चालू आहे, मुख्य म्हणजे गंँगलीडर घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. तिथेच महत्त्वाचा प्रोब्लेम झाला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हा दुर्देवी प्रकार आहे, आरोपीची चौकशी होईल. कठिणातील कठिण कलमे लावली जातील सोडणार नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

फेसबुक लाईव्ह करत मॉरिस भाई याने अगदी जवळून पाच गोळ्या मारून त्यांना संपवलं. अभिषेक घोसाळकर यांना काहीच माहित नव्हतं की मॉरिस शांत डोक्याने मारायला आला होता. मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारल्यावर स्वत: वरही गोळ्या झाडून घेतल्याची माहिती समजत आहे. या घटनेने  दहिसर परिसर हादरून गेला आहे.