मुंबई : पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शहरातील वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय यावर चर्चा करण्यासाठी आज (7 जानेवारी) बैठका घेतल्या. यावेळी पुढील 30 वर्षांत मुंबईमध्ये होणार असलेले संभाव्य बदल समोर ठेवून चर्चा केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात राबवले जाणारे फल्डींग प्लॅनिंग, इंटिग्रेटेड ट्रांन्सपोर्ट हब यासारख्या प्रकल्पावरसुद्धा त्यांनी यावेळी चर्चा केली. (aditya thackeray meeting on mumbai future planning)
मुंबईमध्ये रोज राज्यातील इतर जिल्ह्यांमधून तसेच इतर राज्यांमधून नागरिक येत येतात. त्यांची वाहतूक करण्यासाठी कित्येक बस आणि वाहनं शहरात येतात. ही वाहनं उभी करण्यासाठी शहरात जागा नाही. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये ही वाहनं पार्क करावी लागतात. कधी वाहतूक कोंडी होते. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना राहण्यासाठी जागा नाहीये. ही अडचण दूर व्हावी यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यामध्ये मुंबईच्या इंन्ट्री पॉईन्ट्सजवळ हे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येतील. या ट्रान्सपोर्ट हबजवळ ही वाहन येऊन थांबतील. त्यानंतर मग मुंबई मेट्रो, बेस्टच्या माध्यमातून या प्रवाशांना मुंबईत प्रवास करता येईल, याची प्लॅनिगं आजच्या बैठकीत झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. जानेवारी महिन्याच्या अखेरला या कामासाठी टेन्डर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीमध्ये फ्लडींग स्पॉटबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. “मुंबईत अनेक ठिकाणी फ्लडींग स्पॉट आहेत. मागच्या वर्षी शहरात 386 फ्लडिंग स्पॉट्स होते. या प्रत्येक स्पॉवर मागील काही महिन्यांपासून काम सुरु आहे. प्रत्येक फ्लडींग स्पॉटवर वेगवेगळे इंजिनियर नियुक्त केले आहेत. त्यांच्याकूडन वेगवेगळे रिपोर्ट्स तयार केले आहेत. पाण्याचा निचरा कसा होईल यावर काम सुरु आहे,” असं ठाकरे म्हणाले. तसेच, आगामी 30 ते 40 वर्षांचा काळ समोर ठेवून सगळं नियोजन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मिनी पम्पींग स्टेशन सुरु करण्याचाही विचार असल्याचेही ते म्हणाले.
ओव्हरहेड वायर काढून टाकणार
आगामी काळात मुंबई दृष्य स्वरुपात कशी दिसेल यावरही आजच्या बैठकांमध्ये ठाकरे यांनी चर्चा केली. पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत असलेले सर्व ओव्हरहेडेड वायर काढून टाकण्यात येणार असून यामागे, मुंबई सुंदर दिसावी असा यामगाचा हेतू असल्याचे ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान मुंबईचा विकास आणि आगामी 30 वर्षांमध्ये मुंबईकरांसमोर उभे टाकणारे प्रश्न या सर्व गोष्टी समोर ठेवून आदित्य ठाकरेंच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. मुंबईचे पालकमंत्री या नात्याने ते मुंबईच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाय शोधत आहेत. ठाकरे यांनी आज घेतलेल्या बैठकांना पालिकेचे सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी
(aditya thackeray meeting on mumbai future planning)