आदित्य ठाकरे घेणार ‘या’ नेत्याची भेट, त्यासाठी ‘या’ राज्याचाही दौरा करणार…

| Updated on: Nov 22, 2022 | 8:32 PM

आदित्य ठाकरे यांच्या या बिहार दौऱ्याकडे आता सगळ्या राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्याचबरोबर या भेटीतून नेमके काय साध्य केले जाणार असा सवालही आता राजकीय नेते आणि कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

आदित्य ठाकरे घेणार या नेत्याची भेट, त्यासाठी या राज्याचाही दौरा करणार...
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आणि सत्तेबाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते विरोधकांना भेटत आहेत. त्याआधी आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. काँग्रेसची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी या यात्रेत सहभाग नोंदवत राहुल गांधींसोबत सहभाग नोंदवला होता. आदित्य ठाकरे यांनी हिंगोलीत ज्यावेळी भारत जोडो यात्रा आली होती, त्यावेळी त्यांनी सहभाग नोंदवला होता.

भारत जोडो यात्रेच्या सहभागानंतर आदित्य ठाकरे आता बिहार दौऱ्यावर जात आहेत. या बिहार दौऱ्यामध्ये ते तेथील महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

 

या भेटीमध्ये तेजस्वी यादव यांची ते भेट घेऊन ते त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी हे नेतेही त्यांच्यासोबत जाणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या या बिहार दौऱ्याकडे आता सगळ्या राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्याचबरोबर या भेटीतून नेमके काय साध्य केले जाणार असा सवालही आता राजकीय नेते आणि कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आता राजकीय भेटीगाठींवर जोर दिला आहे. बिहार दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्यामुळे त्यांनी त्यावर ट्विट करत लोकांना महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का? असा प्रश्न विचारुन त्यांनी तीन पर्याय दिले होते.

राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्याकाळातील आदर्श आहेत. तर आताच्या काळातील आदर्श नितीन गडकरी, शरद पवार यांची नावं घेऊन त्यांच्याबरोबर तुलना केल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले होते.