मुंबई : मराठा आरक्षणाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या आणि या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मराठा संघटना मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे गेले, तरीही त्यांना आरक्षण मिळणार नाही,” असा दावा सदावर्ते यांनी केलाय. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते (Adv Gunratn Sadavarte comment on Maratha Reservation and Supreme Court).
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत आज (27 ऑक्टोबर) कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट मराठा संघटना किंवा सरकारने स्थगिती उठवण्यासाठी कोर्टात ब्र देखील काढण्याची हिंमत दाखवू शकलेले नाही. स्थगिती उठवणार असं म्हणणाऱ्या संघटना आणि सरकारने आता थांबलं पाहिजे. तसेच एमपीएससी आणि इतर नोकऱ्यांच्या संदर्भाने मराठा आरक्षण बाजूला सारुन प्रक्रिया सुरु कराव्यात. याची सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलण्यात आलेली आहे. सुनावणीदरम्यान मराठा संघटना आणि सरकार आपली योग्य भूमिका मांडू शकले नाही. सुरुवातीला तर सरकारी वकील हजरही नव्हते.”
“सरकारने एमपीएससी किंवा इतर प्रवेश प्रक्रिया सुरु करायला हवी. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत वाट बघू नये. मराठा संघटना घटनापीठाकडे गेल्या तरी तिकडे सुद्धा आरक्षण मिळणार नाही,” असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणावरील याचिकेची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आता सरकार मराठा समाजाचे हित लक्षात ठेवून नोकरभरती प्रक्रिया राबविण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच त्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. मराठा तरुणांवर अन्याय होऊन देणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सरकार मराठा समजाला सामावून घेत नोकरभरती प्रक्रियेतील तिढा कसा सोडवणार, हे पाहावे लागेल.
तत्पूर्वी आज सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे आता मराठा समाजाला न्याय देत नोकरभरती प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेणार आहेत. नोकरभरती प्रक्रिया थांबवून इतर समाजातील तरुणांवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन इतर जागांची भरती करता येईल का, यावर विचार सुरु आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, एवढीच आमची भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :
‘मराठा समाजाला न्याय देऊन नोकरभरती प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली; कायदेशीर पर्यायांचा विचार’
अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका
Maratha Reservation : अशोक चव्हाण की उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा विषय आता नाही : चंद्रकात पाटील
संबंधित व्हिडीओ :
Adv Gunratn Sadavarte comment on Maratha Reservation and Supreme Court