मुंबई: मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंना हल्ला झाल्यानंतर जालन्यातील मराठा समाजाच्या वैजिनाथ पाटील या तरुणाला वकिलांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी आता कायदा हातात घेणाऱ्या वकिलांवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी उपस्थित केला.
हायकोर्टाबाहेर वैजिनाथ पाटील या तरुणाने गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला केला. एक मराठा, लाख मराठाची घोषणा दिली आणि गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला विरोध का? आमची मागणी मराठा आरक्षणाची आहे, त्याला तुम्ही विरोध का करता, असं हा तरुण ओरडत होता.
यानंतर हायकोर्टाबाहेरील वकिलांनी या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. त्याबाबत बोलताना बाळासाहेब सराटे म्हणाले, “हायकोर्टात आज सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना माध्यमांशी बोलू नका असं बजावलं होतं, तरीही ते बोलण्यासाठी गेले. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वकिलांनीही कायदा हातात घेत त्याला मारहाण केली, याबाबत मात्र कोणीच काही बोलत नाही. वकिलांवर कारवाई होणार का? असा सवाल सराटे यांनी उपस्थित केला.
मराठा समाजातील दोन कोटी लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी शांततेत मोर्चे काढले, त्यावेळी कोणी काही बोललं नाही. आता एक तरुण आक्रमक झाल्यानंतर सर्व समाजाला दोष का देता, असा सवाल सराटेंनी उपस्थित केला.
गुणरत्न सदावर्तेंवरील हल्ल्याची चौकशी करणार
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील हल्ल्याची राज्य सरकार चौकशी करणार आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांने हे केलंय की मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडला आहे, याची चौकशी करु, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली.
एक मराठा, लाख मराठाची घोषणा दिली आणि गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला चढवला
हल्लेखोराने एक मराठा, लाख मराठाची घोषणा दिली आणि गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला विरोध का? आमची मागणी मराठा आरक्षणाची आहे, त्याला तुम्ही विरोध का करता, असं हा तरुण ओरडत होता.
संबंधित बातमी