सावधान रहो..! शेर आ रहा है, राऊत यांच्या जामिनावर भास्कर जाधवांनी कुणाला दिला इशारा

| Updated on: Nov 09, 2022 | 4:48 PM

खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर भास्कर जाधव यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

सावधान रहो..! शेर आ रहा है, राऊत यांच्या जामिनावर भास्कर जाधवांनी कुणाला दिला इशारा
Follow us on

मुंबईः उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी विविध प्रकारे आनंद साजरा केला आहे. संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहेच त्याच बरोबर त्यांनी ते बाहेर पडणार असल्याने आनंदाच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर पडणार असल्याने आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधकांना आणि संजय राऊत यांना त्रास दिलेल्यांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

भास्कर जाधव यांनी सांगितले की, सावधान रहो, शेर आ रहा है, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे विरोधकांना इशाराच दिला आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी टीव्ही नाईनशी बोलतान म्हणाले की, संजय राऊत यांना ज्यांनी कुणी त्रास दिला असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की, सावधार रहो, शेर आ रहा है असा त्यांनी इशाराच दिला आहे.

यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, संजय राऊत आता पूर्वीपेक्षा आता आणखीन नव्या उमेदीने आणि ताकदीने लढतील असा विश्वासही भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत आज सुटत असले तरी झालेल्या अपमानाचा ते बदला घेतील असं मतही भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे. भास्कर जाधव यांनी त्यांच्या जामिनावर बोलताना विरोधकांनाही त्यांनी इशारा दिला आहे.

संजय राऊत यांना जामीन मिळताच राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या विविध पद्धतीने स्वागत केले आहे. संजय राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर ते आधी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन स्मृतिस्थळालाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.