मुंबई : बागेश्वर बाबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. साईबाबांबद्दल केलेलं वक्तव्य बागेश्वर बाबाला भोवण्याची शक्यता आहे. कारण बागेश्वर बाबाच्या विरोधात ठाकरे गटाचे नेते राहुल कनाल यांनी पोलिसात तक्रार केलीय.
राहुल कनाल- मुंबई पुलीस के लँग्वेज मे एक होते हे क्रिमिनल. एक होते है हॅबिट्यूअल क्रिमिनल आधी त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी साईबाबांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय. हे हॅबिट्यूअल क्राईम आहे. या लोकांना काय पदवी द्यायची. काय लायकी आहे या लोकांची साईबाबांच्या संदर्भात बोलतात.
बागेश्वर बाबानं साईबाबा आणि संत तुकाराम महाराजांबद्दल कुठली वादग्रस्त वक्तव्ये केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बागेश्वर बाबावर टीका केलीय. बागेश्वर बाबाला वर्तकनगरच्या साईमंदिराजवळ येण्याचं आव्हानही आव्हाडांनी दिलंय. जितेंद्र आव्हाड-आम्ही गुरुवारी रात्री 8 वाजता.. आम्ही सगळे जण जाणार आहोत..साईबाबांची आरती गुरुवारी वर्तकनगरच्या मंदिरात आरती करणार आहोत.. असेल हिंमत बागेश्वरची तर येऊन थांबून दाखव))
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान देणाऱ्या बाबानं आता वारकरी संप्रदायाबरोबरच साईभक्तांचीही नाराजी ओढवून घेतलीय.