Agnipath Scheme : मोदी सर्वात जास्त गोंधळलेले पंतप्रधान, अग्निपथ योजनेवरून राष्ट्रवादीची जहरी टीका

| Updated on: Jun 18, 2022 | 3:23 PM

"पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत." असे ट्विट राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

Agnipath Scheme : मोदी सर्वात जास्त गोंधळलेले पंतप्रधान, अग्निपथ योजनेवरून राष्ट्रवादीची जहरी टीका
मोदी सर्वात जास्त गोंधळलेले पंतप्रधान, अग्निपथ योजनेवरून राष्ट्रवादीची जहरी टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : देशभरात मोदी (PM Modi) सरकारन आणलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) आक्रमक आंदोलन सुरू आहेत. अनेक ठिकाणी हिंसाही झाली आहे. आत्ता या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीने याच योजनवरून मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीने (NCP) मोदी सरकारच्या मागील काही निर्णयाची उदाहरणेही यावेळी दिली आहे. त्यात, नोटबंदी कृषी कायदे अशा योजनांच्या दाखल्याचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत लिहिले आहे की “पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत.” असे ट्विट राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचं दुसरं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी 20 जूनला राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे, असा आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी दिला आहे.