मुंबई : अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. अजित पवार यांनी मस्ती उतरवण्याचा इशारा दिलाय. तर कुणात मस्ती आली, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे. तर, विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना पार्थ पवार यांच्या पराभवाची आठवण करून दिली. कोणाचा माज उतरवायचा नाही. गाव पेटवायला एक काठी ओढणारा नालायक लागतो. गाव वसवायला शंभर लोकं लागतात. विजय शिवतारे तेवढाच ताकदीचा आहे. त्यामुळे मी अजिबात गप्प राहणार नाही, असं प्रत्युत्तर विजय शिवतारे यांनी दिलं.
अजित पवार आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विजय शिवतारे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. अजित पवार यांनी काल मुलाखत दिली. २०१९ च्या पुरंदर विधानसभा निवडणुकीची आठवण करून देण्यात आली. अजित पवार यांनी त्या निवडणुकीत विजय शिवतारे यांना पराभूत करण्याचे जाहीर आव्हान दिले होते.
शरद पवार यांच्यावर टीका करता. सुप्रिया सुळे या उत्तम संसदपटू आहेत. त्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात. राज्याची संस्कृती आहे. महिलांबद्दल वक्तव्य करताना भाषा कुठली असली पाहिजे. काही तारतम्य ठेवलं पाहिजे. कुणाला काही मस्ती आली तर ती मस्ती चिरवण्याची ताकद आपल्यात आहे, असं अजित पवार म्हणाले.
विजय शिवतारे म्हणाले, मी असं बोलणार नाही. पण, मी इतिहास घडवेन. लोकं इतिहास घडवतील. तुम्ही कोण माज मोडणारे. माज मोडायची हिंमत आहे तर तुमच्या पोराला निवडून का आणलं नाही. विजय शिवतारे यांनी तिथं शिवसेनेचं काम केलं. अशा धमक्या द्यायच्या नाहीत, असा सज्जड दमही विजय शिवतारे यांनी दिला.
अजित पवार यांना माज आला असेल तर काळच उत्तर देईल. अजित पवार यांची स्थिती राज ठाकरे यांच्यासारखी होणार असल्याचा घणाघात विजय शिवतारे यांनी केला. राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली. तसंच अजित पवार यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागेल. असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला.