मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर असणारा गट हा शिंदे-भाजप सरकारसोबत जाणार आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची तर, छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
३० आमदारांचं सह्यांचं पाठिंबा असलेलं पत्र अजित पवार यांच्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली होती. प्रफुल्ल पटेल हे राजभवनावर दाखल झाले आहेत. अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेला आहे. ते शिंदे-भाजप सरकारसोबत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेदेखील राजभवनावर दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५४ आमदार आहेत. त्यापैकी ३० आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना आहे. या ३० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. हे पत्र घेऊन अजित पवार हे राजभवनावर पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांच्या सह्यांचं पाठिंब्याचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. या पाठिंब्याच्या सह्यांचं पत्र अजित पवार हे राज्यपालांना सुपुर्त करतील. त्यानंतर आज सायंकाळी राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा राजभवनावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा लवकरच राजभवनावर दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्यासोबत ३० आमदार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत आहेत. संध्याकाळी सहा वाजता अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.