मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज त्यांच्या आयोध्या (Ayodhya) दौऱ्याची घोषणा केली. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेही आयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आयोध्येला निघालेल्या राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हटके स्टाईलनं टोलेबाजी केली आहे. ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, भारतात कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याचा इतका बोभाटा करायचे काम नाही. आम्हीही शिर्डीला गेलो पण बोभाटा केला नाही. पण काहींना आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवतोय, असे दाखवायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध मनसे संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीच्या उदयापासून जातीय राजकारण वाढल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. तर त्याला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
तसेच याच मुद्द्यावरून बोलताना अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व मराठी माणसांना एकत्र ठेवण्याचे काम केले. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या रस्त्याने शिवसेना पुढे चालली आहे. तो मराठी माणूस तुमच्या सोबत येत नाही म्हणून कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मशीदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरूनही जोरदार राजकारण तापलं आहे. यावरही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. काल आम्हीही हनुमान चाळीसा बोललो त्याचा प्रोपोगोंडा करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच निवडणूका आल्यावर आमची भूमिका मांडू. कोणत्या शहरासाठी काय केले आणि काय करणार आहोत हे सांगणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कोल्हापूर निवडणूक निकाल आणि त्यावर ट्रोल होणारे चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत कोणाचा जय तर कोणाचा पराजय होत असतो. त्यामुळे अशा वक्तव्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही. कोणीही सगळं सोडून हिमालयात जाणार नाही हे आपल्यालाही कळत, अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रकात पाटलांच्या हिमालयात जाण्यावरील वक्तव्यावर आणि त्यावरून सुरू असलेल्या ट्रोलिंगवर दिली आहे.
महाविकास आघाडीचा रायगडातील पहिला बळी, सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत संभ्रमावस्था
Video : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल