बदलापूरमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी 23 सप्टेंबरला एन्काऊंटर झाला. पोलिसांनी त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये गोळी मारल्याचं सांगितलं आहे. मात्र हा एन्काऊंटर आधीच स्क्रिप्टेड स्टोरी असल्याची टीका विरोधक करक आहेत. पोलीस देत असलेल्या माहितीवरून अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत .त्यामुळे अक्षय शिंदे याला ज्या पोलीस व्हॅनमधून घेऊन जात होते त्यात काय घडलं? याबाबत एन्काऊंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांचा जबाब नोंदवला गेला आहे.
बदलापूर पोलीस ठाण्यातील अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यामुळे तपासासाठी ठाणे क्राईम ब्राँचची टीम तळोजा कारागृहात ट्रान्सपर वॉरंटसह आली. संध्याकाळी चार वाजता पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेला घेऊन ठाण्याकडे निघालो. व्हॅनमध्ये संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे, हरिश तावडे हे पोलीस अधिकारी होते. यामधील संजय शिंदे हे ड्रायव्हरशेजारी तर निलेश मोरेंसोबत दोन पोलीस आरोपीच्या शेजारी बसले होते. रस्त्यात जात असताना आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करू लागला आणि मला जाऊ द्या अस म्हणू लागला. त्यानंतर निलेश मोरे यांनी संजय शिंदेंना फोन करून सांगितलं. संजय मोरे हे स्वत: आरोपी अक्षयच्या समोर बसले होते. अक्षय शिवीगाळ करत होता, सहा ते सव्वा सह वाजता पोलीस व्हॅन मुंब्रा-बायपास रोडवर आल्यावर आरोपीने निलेश मोरेंच्या जवळील पिस्तुल तो खेचू लागला. दोघांमध्ये झटापट झाली, त्यावेळीच पिस्तुल लोड होईन एक गोळी फायर झाली, यामध्ये निलेश मोरे जखमी झाली ही गोळी त्यांच्या मांडीला लागली. अक्षयने पिस्तुल स्वत:कडे घेत संजय शिंदे आणि हरिश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या दोन्ही गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत यादरम्यान संजय शिंदे यांनी अक्षयवर एक गोळी झाडत त्याला जखमी केले. त्यानंतर पोलिसांना त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात आणले तिथल्या डॉक्टरांनी ज्युपिटर हॉस्प्टिटलमध्ये रेफर केलं तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
संजय शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. संजय शिंदे हा वादग्रस्त अधिकारी असून तो अनेक एन्काऊंटरमध्ये वादात सापडला आहे. टीकूच्या हत्येतील आरोपी विजय पालांडेला पळवण्यात संजय शिंदे यांचा हात होता. संजय शिंदे हा प्रदीप शर्माचा देखील काही काळ साथीदार राहिला आहे. सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अक्षयचा एन्काऊंटर म्हणजे राज्य प्रायोजित दहशतवाद असं उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांच्या स्तरावरची समिती नेमा आणि या सगळ्या फॅक्ट तपासून बघा, हा फेक एन्काऊंटरची स्क्रिप्टेड स्टोरी असून ही कमिटी थट्टा असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.