Almighty Dam : अलमट्टी सांगलीकरांच्या मुळावर, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे वाढला पुराचा धोका

| Updated on: Dec 19, 2024 | 5:08 PM

Almighty Dam Sangli flood risk : कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फूट वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. त्यासाठी जलदगतीने काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी सांगली जिल्ह्याला पुराचा वेढा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. पूरस्थिती गंभीर होणार आहे.

Almighty Dam : अलमट्टी सांगलीकरांच्या मुळावर, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे वाढला पुराचा धोका
सांगली, कोल्हापूरचे अश्रू कोण पुसणार?
Follow us on

कर्नाटक सरकारचा एक निर्णय सांगलीकरांच्या मुळावर उठला आहे. कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फूट वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. त्यासाठी जलदगतीने काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी सांगली जिल्ह्याला पुराचा वेढा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकचा भाग सुजलाम सुफलाम होणार असला तरी सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याला कृष्ण महापूर नियंत्रण कृती समितीने ही विरोध केला आहे.

काय आहे अपडेट?

उत्तर कर्नाटकातील दुष्काळ निवारण आणि सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी अलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी सध्या 519.60 मीटर आहे. अलमट्टी धरणामुळे सांगलीला महापुराचा धोका वाढण्याची भीती काही तज्ञांनीही व्यक्त केलेली आहे. याबाबत वडनेरे समितीनेही सूचक विधान केले आहे.

हे सुद्धा वाचा

बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे. कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी सव्वा लाख एकर जमीन भूसंपादन आणि पुनर्वसन याला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कर्नाटकातील जमीन सिंचनाखाली येणार मात्र याचा फटका सांगलीला बसणार आहे.

सांगलीच नाही तर कोल्हापूर जलमय होणार

2005 सालच्या महापुरा वेळी अलमट्टी धरणाचा फुगोटा नरसेवाडी पर्यंत पोहोचला होता. आता तो सांगली जिल्ह्यातील डिग्रज पर्यंत पोहोचला असल्याचे सिद्ध झाले आहे. जर धरणाची उंची पाच फूट वाढवली तर कोल्हापूर-सांगली जिल्हा हा जलमय होणार आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढीला स्थगिती मिळावी अशी आग्रही मागणी कृष्ण महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने केली आहे.

अलमट्टीविरोधात आवाज उठवणार

दरम्यान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा अलमट्टीची उंची वाढवण्यास कडाडून विरोध केला आहे. अलमट्टीची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूरच नव्हे तर कर्नाटकचा नदीकाठ जलमय होईल असे ते म्हणाले. अलमट्टी विरोधात आवाज उठवणार असल्याचे शेट्टी म्हणाले.