“नैसर्गिक न्यायाला धरून सुनावणी सुरू”; ठाकरे गटानं न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त केला

| Updated on: Feb 22, 2023 | 6:27 PM

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांच्या बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता त्यातच हे प्रकरण ज्या वेळी निवडणूक आयोगाकडे गेले होते.

नैसर्गिक न्यायाला धरून सुनावणी सुरू; ठाकरे गटानं न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त केला
Follow us on

मुंबईः ठाकरे गटाच्या आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळी मतं व्यक्त केली जात असली तरी सर्वोच्च न्यायालयात आमची भूमिका एकूण घेतली जात आहे असे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पक्षातर्फेदेखील आम्ही आमची बाजू योग्य पद्धतीने मांडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्य न्यायालय याबाबत आता सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरु असलेली सुनावणी ही नैसर्गिक न्यायाला धरून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाकडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करून अशा फक्त अफवा पसरवल्या जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयानंतरच शिंदे गट विचार करेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने आम्ही त्यांच व्हीप मानत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरुन असे दिसून येत आहे की, ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट असून त्याबाबत सर्व बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे गटाला न्याय देतील असा विश्वास आम्हाला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांच्या बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता त्यातच हे प्रकरण ज्या वेळी निवडणूक आयोगाकडे गेले होते.

त्याच वेळी त्यांनांही शिवसेना ही विभक्त झाली आहे हे निवडणूक आयोगानं मान्य केलं असल्याची माहितीही अंबादास दानवे यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून आमची बाजू योग्य पद्धतीने ऐकून घेतली जात असल्याने आणि पक्षातर्फेही कपिल सिब्बल यांच्याकडून बाजू योग्य पद्धतीने न्यायालयात मांडली जात असल्यामुळे आम्ही याबाबत आशावादी आहोत असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.