मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न झाला होता असा थेट आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या आरोपांवर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार गेल्या नंतर त्या गोष्टीची यांना जाणीव झाली आहे का असा सवाल उपस्थित केला आहे,
तर विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना या चोरांच्या उलट्या बोंबा म्हणतात ते या फडणवीस यांच्या आरोपातून दिसून आले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्या कार्यशैलीवर टीका करत मविआने आपल्याला अटक करण्याचे षडयंत्र रचले होते असा जाहीर आरोप केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांच्या वर चोराच्या उलट्या बोंबा म्हणत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही त्या काळात असं काही घडलेच नव्हते म्हणत फडणवीस यांच्या आरोपाला थेट उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने नागपुरच्या अॅड. मुखे यांना ईडी लावली आणि त्यांनीच तुरुंगात कोंबले होते कारण त्यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत काळात भ्रष्टाचार केले होते. ते मुखे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या खोटे आरोप करून त्यांनी ईडीने फसवले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपामुळे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार खात त्यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.