उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 05, 2022 | 5:29 PM

महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. त्यामुळं यात कुणालाही हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
अंबादास दानवे
Follow us on

मुंबई – उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची चिन्हे आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठेवणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटानचे नेते अंबदास दानवे म्हणाले,  शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबाबत आपण घाई करू नये. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनापासून एकत्र येत आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रात वैचारिक पातळी निर्माण केली. या दोघांचेही नातू एकत्र येत असतील, तर राजकारणचं नाही तर यात समाजकारणाकडंही लक्ष दिलं पाहिजे. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र आल्यास हे स्वागतार्ह पाऊल ठरू शकतं, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. यापूर्वीही शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलेली आहे. यात काही जणांनी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही शक्ती एकत्र आल्यास सामाजिक-राजकीय दृष्टीनं चांगलं पाऊल ठरेल, अशी अपेक्षाही अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्राचं सरकार या धमक्यांना घाबरत हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. छत्रपती शिवराय यांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातलं सरकार हे कर्नाटकच्या धमक्यांना घाबरत आहे. हे राज्यातील जनतेचं दुर्दैव आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज हल्ले करताहेत. टीका करताहेत. जतमध्ये पाणी सोडतात. सोलापूर, अक्कलकोटही आमचं म्हणतात. आपले मुख्यमंत्री तोंड बंद करून बसले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

अशा स्थितीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तरं देण्याची गरज आहे. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणं जत तालुक्यात कर्नाटकनं पाणी सोडलं. या पाण्यात या मंत्र्यांनी जीव दिला पाहिजे.

महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. त्यामुळं यात कुणालाही हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.