दादर : दादर स्टेशन (Dadar Station) म्हणजे वर्दळीचं ठिकाण, तिथं कायम गर्दी असते. तिथून इतर राज्यात जाण्यात रेल्वेगाड्या, त्याचबरोबर सेंट्रल आणि वेस्टर्न लाईन तिथून गेली आहे. दादर स्टेशनला किंवा मुंबईत रोज असंख्य मोबाईल चोरीला गेल्याची आणि हरवल्याच्या तक्रारी पोलिस (Dadar Police) स्टेशनला दाखल केल्या जातात. हरवलेले मोबाईल क्वचित परत केले जातात. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांचा हरवलेला मोबाईल परत केला. हा मोबाईल परत करणारी व्यक्ती दादर स्टेशनला हमाल म्हणून काम करीत आहे. त्या व्यक्तीचं सगळीकडं कौतुक करण्यातं येत आहे., सध्याच्या घडीला असा प्रामाणिकपणा क्वचित पाहायला मिळत आहे.
रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या 62 वर्षीय हमालाचा प्रामाणिकपणा सगळ्यांना आवडला आहे. त्यामुळे त्यांचं सगळ्याच्याकडून कौतुक केलं जातं आहे. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांचा हरवलेला मोबाईल परत केला. दादर रेल्वे स्टेशनवर मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे स्वतःचा सॅमसंग कंपनीचा दीड लाखांचा मोबाईल विसरले होते. हा विसरलेला मोबाईल दादर रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या दशरथ दौंड या हमालाला सापडला. सापडलेला मोबाईल त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जमा केला आणि ज्यांचा असेल त्यांना सोपवा अशी विनंती केली. मोबाईलधारक दीपक सावंत यांनी त्यांच्या फोनवर संपर्क केला असता पोलिसांशी त्यांचे बोलणे झाले आणि मोबाईल त्यांच्या मुलाच्या स्वाधीन करण्यात आला. हा मोबाईल ज्या हमालाने परत केला त्यालाही योग्य ते बक्षिस देऊन त्यांच्या प्रमाणिकपणाचा सन्मान करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हमालाने केलेल्या कामाचं सगळीकडं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सुध्दा त्या हमालाचं कौतुक केलं आहे. इतका महागडा मोबाईल दिल्यामुळे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे सुध्दा खुष झाले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांचं कौतुक करुन त्यांना बक्षिस दिलं आहे. रोज असंख्य मोबाईल चोरीच्या घटना घडत असतात. परंतु त्यापैकी क्वचित मोबाईल परत मिळाले जातात.