Amol Mitkari : कोण हारतो, कोण जिंकतो, याची चिंता हवी कशाला? अमोल मिटकरी यांचा काँग्रेसला चिमटा, काँग्रेसच्या आमदाराचा शायरीतून भीमटोला

| Updated on: Jun 28, 2024 | 4:27 PM

Amol Mitkari attack on Congress : अमोल मिटकरी सध्या अजित पवार गटाचा एकहाती किल्ला लढवताना दिसत आहे. भाजप, शिंदेसेना या महायुतीमधील स्व‍कीयांच्या हल्ल्यावर त्यांनी त्वेषाने किल्ला लढवला. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गोटातील वादळ समोर आले आहे.

Amol Mitkari : कोण हारतो, कोण जिंकतो, याची चिंता हवी कशाला? अमोल मिटकरी यांचा काँग्रेसला चिमटा, काँग्रेसच्या आमदाराचा शायरीतून भीमटोला
अभंग, शेरोशायरीतून एकमेकांना भीमटोले
Follow us on

अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पण लोकसभा निकालानंतर महायुतीत अलबेल नसल्याचे दिसून आले. अमोल मिटकरी यांनी महायुतीतील हल्ल्यांना त्वेषाने तोंड दिले. भाजप आणि शिंदेसेना अजित पवार गटावर नाराज असल्याचे समोर आले. त्यावेळी अमोल मिटकरी यांनी थेट वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली. अर्थात त्यांना पक्षातून कान टोचणी मिळाली. आता महायुतीच नाही तर काँग्रेसने पण त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गोटातील वादळ समोर आले. टीव्ही ९ मराठी बोलताना अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अभंग, शायरीतून असे भीमटोले दिले.

मिटकरींचा भाजप-शिंदेसेनेला इशारा 

महायुतीमध्ये अजित दादांच्या बाबतीत कोणी दुर्भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये. वारंवार बोलून महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी आपली इमेज खराब करून घेऊ नयेत, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. यापूर्वी अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला होता. त्यावरुन त्यांनी आज हा इशारा दिला.

हे सुद्धा वाचा

गोरंट्याल यांचा दिली ही धमकी

अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे जवळच होते. अजितदादांविषयी काँग्रेसच्या गोटात काय चालले आहे, याची चुणूक यावेळी गोरंट्याल यांनी दाखवली. विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. त्यात अजित पवार जर पुन्हा राष्ट्रवादीत परत आले तर त्यांना घेऊ नये, काँग्रेसच्या पक्ष प्रमुखांनी त्यांना विरोध करावा, अशी मागणी केल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं कशी वळण घेत आहेत, हे दिसून येत आहे.

अजित पवार हे राज्याचे गरुड

त्यावर लागलीच मिटकरी यांनी उत्तर दिले. काँग्रेसमधील ही खदखद समोर आल्याचे ते म्हणाले. पण एक गोष्ट त्यांनाही सांगतो की जे जो गरुड पक्षी असताना पक्षाचा राजा त्याला कोणाच्या कुबड्यांची गरज लागत नाही. शेवटी अजितदादा या महाराष्ट्राच्या गरुड पक्षासारखा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आल्यानंतरच त्यांचं भलं होईल किंवा आमच्याकडे त्यांना घेऊन येऊ नका ,असं जर कोणी करत असेल तर त्या त्यांच्या बाष्कळ गप्पा आहेत, असा टोला मिटकरी यांनी गोरंट्याल यांना लगावला.

कोण जिंकतो चिंता हवी कशाला

अजित दादा या महाराष्ट्राचा ब्रँड आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त फायदा अजित दादांमुळे झाला. उद्धव ठाकरे सुद्धा सदनामध्ये येत नव्हते. त्यावेळेस जीवाची परवाना करता अजितदादा मंत्रालयात बसत होते. यशोमती ताई त्यावेळेस महिला बालकल्याण मंत्री होते. त्याच्यामुळे मला असं वाटते काँग्रेस पक्षाने काँग्रेसची काळजी करावी. ‘कोण हार तो कोण जिंकतो चिंता हवी कशाला चिंता’ याची चिंता लढणाऱ्याला बघणाऱ्याला नाही असा चिमटा मिटकरी यांनी यावेळी काढला.

जिनके घरो मै मिठे गठ्ठे होते वो दिल से बडे होते है

जो मिठ्ठे होते है वो अंधर से सडे होते है,

अशा शायरीतून गोरंट्याल यांनी निशाणा साधला. तर ‘तुका म्हणे विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं’ असा टोला मिटकरी यांनी लगावला. या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता.