मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे ओबीसींचे घटक आहेत. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ओबीसींना आरक्षण द्यावं. एकीकडे फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका, अशी घणाघाती टीका अमोल मिटकरी यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणावरून राजकारण करायचा हा देवेंद्र फडणवीस यांचा सुप्त अजेंडा आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला कालपासून कामकाज हाणून पाडायचं होतं. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. काही काम नसल्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.
आमदार अमोल मिटकरी यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेतलं. नितीन गडकरी यांनी दाऊदची तुलना स्वामी विवेकानंदांशी केली होती. ती चालते. पण नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध नसताना गोंधळ घातला जातोय, अशी टीका मिटकरी यांनी केली. भाजपने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. त्यावर नरहरी झिरवळ यांनी सही केली. त्यामुळे आता सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाही. नरहरी झिरवळ हे अत्यंत साधे आहेत. त्यांच्या साधेपणाचा फायदा या कलम कसायांनी घेतला. कलम दिली आणि चुकीने ते झालं, माझ्या हातीही कलम दिली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करता येणार नसल्याचा अहवाल आला आहे. त्याबाबत विचारले असता, भाजपने एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही दलाल सोडले आहेत. त्यांनीच हे सगळं पसरवलंय, असा दावा त्यांनी केला.
सोलापूरात जाऊ नये अशी विनंती राज्यपालांना सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केली होती. पण विंचवाच्या बिऱ्हाडात हात घालण्याची राज्यपालांना सवय आहे. ते सोलापुरात आले. त्यामुळे शिवप्रेमींनी राडा केला. राज्यपालांना प्रत्येक ठिकाणी जाब विचारला जाईल, सोलापूरसह अख्खा महाराष्ट्र पेटेल, असा इशाराच त्यांनी दिला.
VIDEO : कोर्टात ओबीसी आरक्षणाचा अहवाल ठाकरे सरकारने ओबडधोबड अहवाल सादर केला: पंकजा मुंडे#PankajaMunde #OBC #Reservation pic.twitter.com/yBulkJisui
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2022
संबंधित बातम्या:
पाकिस्तानमधील मशीदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?
Maharashtra News Live Update : राज्यपालांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोहोचलं