मुंबई : राज्यात सध्या विविध मुद्द्यावरून जोरदार राजकीय खडाजंगी सुरू आहेत. त्यात किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला, नवनीत राणा आणि रवी राणा यांना झालेली अटक, तर हमुमान चालीसा आणि हिंदूत्व हेही मुद्दे गाजत आहेत. यात पुन्हा सत्ताधारी विरोधत आमनेसामने आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून सर्वच भाजप नेते सध्या शिवसेनेला हिंदुत्वासह विविध मुद्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा आता अमृता फडणवीस कशा मागे राहतील. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या वेळोवेळी ट्विटर आणि इतर माध्यमातून मुख्यमंत्री आणि शिवसेनेला टार्गेट करत असततात, तसेच त्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा वेळोवेळी समाचार घेत असातात. आधी महापौर किशोरी पेडणेकर, संजय राऊत, नाना पटोले यांना अमृता फडणवीस टार्गेट करताना दिसून आल्या. आता त्यांनी पुन्हा थेट मुख्यमंत्र्यांना (Cm Uddhav Thackeray) टार्गेट केले आहे.
“उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? बायकोच्या भावाच्या ताब्यात?” असा ट्विटवरून सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ट्विट करत ऑप्शनची यादीही सादर केली आहे. त्यांनी ट्वट करत लिहले आहे की, थोडक्यात उत्तर धावे; (उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किव्हा सर्व पर्याय निवडून धावे)
उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ?
1 वसूली च्या ताब्यात
2 विकृत अघाडीच्या ताब्यात
3 लोड shedding च्या ताब्यात
4 Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात
5 गुंडांच्या ताब्यात
अमृता फडणवीस या एवढेट पर्यय देऊन थाबल्या नाहीत तर त्यांनी सहावा पर्याय देत मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या भावाचाही उल्लेक केला आहे. त्यांनी सहा पर्याय देत लिहिले आहे की, एक पर्याय लिहायला विसरलेच ;
6. बायकोच्या भावाच्या ताब्यात …
एक पर्याय लिहायला विसरलेच ;
६. बायकोच्या भावाच्या ताब्यात …#Maharashtra #Maharashtraunderattack https://t.co/yDKp6taewo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 24, 2022
अशा आशयाचे ट्विट आता अमृता फडणवीसांकडून करण्यात आल्याने शिवसेना त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्याच शक्यता आहे. एकिकडे भाजप नेते सध्या लोड शेडिंग आणि कायदा आणि सुव्यवस्थेवररून शिवसेनेला टार्गेट करत आहे. राज्या राष्ट्रपती राजवट लागू करावी असा उल्लेख वारंवर भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय. अशातच अमृता फडणवीसांचे असे ट्विट आल्याने आता हा वाद आणखी वाढणार एवढं मात्र नक्की झालं आहे.
CM Uddhav Thackeray : आजी म्हणाल्या, साहेब, घाबरू नका मुंबईत शिवसेनाच येणार; उद्धव ठाकरे म्हणाले…