हरीयाणा : पोलीस पैसे खातात असे तुम्ही ऐकून असालच, परंतू हरीयाणाच्या एका म्हस चोरीच्या प्रकरणात लाच स्वीकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा रंगेहात पकडण्यासाठी स्पेशल दक्षता पथक पोहचले तेव्हा आक्रीतच घडले. या पोलीस महाशयांनी लाचेच्या नोटाच गिळण्याचा अचाट पराक्रम केल्याचे उघडकीस आले आहे.
हरीयाणातील फरीदाबाद येथील हे प्रकरण आहे. व्हीजिलन्स टीमने मिळालेल्या माहितीनूसार सापळा रचला. आणि सब इन्सपेक्टर महेंद्र उला याला पैसे घेताना पकडले तसे त्याने अधिकाऱ्यांच्या हाताला झटका देत त्याने लाच म्हणून स्वीकारलेल्या नोटा थेट तोंडात टाकून गिळायला सुरूवात केली.
दक्षता पथकाच्या अधिकारी घटनास्थळी फिल्डींग लावून उभे असतानाच संबंधित इन्सपेक्टरने लाचेची रक्कम स्वीकारताच त्या अधिकाऱ्यांनी घेरून पकडले. आपण अडकलो याची जाणीव झालेल्या इन्सपेक्टरने लागलीच अधिकाऱ्यांना झटका देत नोटाच थेट तोंडातच कोंबल्या. त्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्याने लागलीच त्याला रोकण्याचा प्रयत्न केला. त्याने या अधिकाऱ्याच्या तोंडात हात घालून नोटा काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
या पोलीसाने तक्रारदाराकडे चोरीला गेलेल्या म्हैस प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्यासाठी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी सहा हजार त्याने पोलीसाला आधीच दिले होते. उरलेली रक्कम देण्यासाठी तो आला असता त्याच्या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याची माहीती सूत्रांनी दिली.