नागपूर/ मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (CBI raid on Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले. सीबीआयचे अधिकारी PPE किट घालून ही छापेमारी केली.
दरम्यान जवळपास दहा तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर पडले. यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या.
(Anil Deshmukh house and office raid by CBI live news in marathi today Maharashtra former home minister booked by Central Bureau of Investigation)
सांगली : अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुखांच्या मागे सीबीआय लावली आहे. देशमुख यांच्या मागे लागण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती. देशमुख यांच्यावर दाखल केलेली FIR ही अंत्यत भोंगळ स्वरूपाची आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारी आहे. सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. सीबीआयचा राजकीय वापर होतोय. राज्यात मोघलाई लागलीय असे वाटावे असा हा आजच्या अनिल देशमुख यांच्या झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटते. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला 100 टक्के काहीच सापडले नसेल. त्यामुळे FIR दाखल केला. अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी FIR दाखल केली मग छापेमारी सत्र सुरू केले”, असं जयंत पाटील म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा सीबीआय पथक दाखल झाले. त्यामुळे त्यांना काटोल येथे न जाता अर्ध्या वाटेवरुन घरी परतावं लागलं होतं. त्यानंतर सीबीआयच्या सहा जणांच्या पथकाने देशमुख यांची जवळपास अडीच तास चौकशी केली. या चौकशीनंतर देशमुख काटोलला निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीबीआयची टीम पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाली आहे. त्यामुळे काटोलला कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी निघालेले अनिल देशमुख पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. दहा तासांच्या चौकशीनंतर पुन्हा सीबीआय टीम देशमुख यांच्या घरी आली.
सीबीआयची टीम घरी सर्च करायला आली होती. त्यांना आम्ही सहकार्य केलं. आता मी नागपूरमध्ये जो कोरोना वाढतोय, तिकडे कोव्हिड सेंटरला भेट देण्यासाठी मी जात आहे.
सीबीयची टीम माझ्या घरी आली होती. मी त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. सध्या कोरोना वाढला आहे. त्यामुळे मी आता नागपूरमध्ये कोविड सेंटरला भेट द्यायला जात आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू सीबीआयच्या ताब्यात, प्रिंटर आणि वस्तू पांढऱ्या कपड्यात बांधून अधिकाऱ्यांच्या ताब्यात. PPE किट घालून अधिकारी अनिल देशमुखांच्या घरात. जवळपास 10 तास चौकशी केल्यानंतर सीबीआयचे अधिकारी अनिल देशमुखांच्या घरातून बाहेर पडली
पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे वर्षा बंगल्यावर दाखल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन्ही अधिकाऱ्यांची चर्चा सुरू, पोलीस महसंचालक संजय पांडे आज दुसऱ्यांदा वर्षा बंगल्यावर
अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरून सीबीआय टीम निघाली. तीन गाड्यांमधून सीबीआयचे अधिकारी बाहेर पडले. सकाळपासून अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी
सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…https://t.co/1cTQ7PMVxC#sanjayraut | #shivsena | #AnilDeshmukh | #parambirsingh | #parambirsinghletter | #ncp | #sachinwaze
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2021
ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? हा अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ED चौकशी लावली, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. देशमुख यातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचार करताना कुठलीही लाज न बाळगणाऱ्या अनिल देशमुखांना तुरुगात जावं लागेल. भाजप खासदार मनोज कोटक यांची सणसणीत टीका. अनिल देशमुख हे खुर्चीला चिटकून बसणारे वसुली मंत्री होते. कोरोना काळात जनतेच्या पैशांचे वाटेकरी कोण हे सगळ्यांना माहीत आहे. आज अनिल देशमुखावर सीबीआयमार्फत कारवाई, उद्या इतर वाटेकऱ्यांचीही नावे समोर येतील, अशी टीका खासदार मनोज कोटक यांनी केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयच्या धाडीनंतर महाविकास आघाडीत खलबतं, वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.