मुंबई : “कोणी कोणावर आरोप केले म्हणजे कारवाई होत नसते. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची कायद्यानुसार चौकशी होईल. त्यानंतर कादेशीर निर्णय घेतला जाईल. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप झाले आहेत. मग काय त्यांना लगेच फासावर चढवायचं का?,” असे भाष्य परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर केले. ते मुंबई ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना सर्व गोष्टी कायदेशीररित्या होतील असं सांगितलं. (Anil Parab comment on allegations that are made on Dhananjay Munde)
“कोणी कोणावर आरोप केले म्हणजे तातडीची कारवाई होत नाही. विरोधकांचं कामच आरोप करणे हे आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले आहेत; त्याची चौकशी होईल. या सर्व गोष्टीसाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याप्रमाणेच सर्व गोष्टी होतील,” असे परब म्हणाले. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. या सर्व गोष्टींची खुलासेवार चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय तो निर्णय घेतील, असेही अनिल परब म्हणाले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर बोलताना सगळ्या गोष्टी कायदेशीर मार्गाने होतील असं सांगितलं. “तक्रार करणे किरीट सोमय्या यांचा धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून कारवाई करायची हा एकाप्रकारे कुणावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कुणी काही म्हणू देत, सत्य बाहेर येऊ देत. त्यांनतरच काय तो निर्णय होईल,” असं अनिल परब म्हणाले.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर बोलताना पक्षाशी चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय.णि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या पक्षनेत्यांची आज (14 जानेवारी) बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि धनंजय मुंडे या दोन प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं
(Anil Parab comment on allegations that are made on Dhananjay Munde)