भारतीय जनता पार्टीने लोकसभेत खूप दादागिरी केली. मात्र एकनाथ शिंदे हे देखील भाई आहेत. त्यांनीही भाईगिरी केली. दादागिरी वर्सेस भाईगिरीमध्ये भाईगिरी यशस्वी ठरली आहे. एकनाथ शिंदेनी 15 जागा घेतल्या. कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यामिनी जाधव यांची जागा शिंदेंसाठी आवघड होईल. शिंदेंच्या 15 पैकी पाच पडतील आणि दहा जागा निवडून येणार हा अंदाज आहे. नरेश मस्के यांचे गुडविल कमी आहे. त्यांची नुकसान भरपाई ही एकनाथ शिंदे यांच्या पुण्याईमुळे होणार आहे, असं राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राजन विचारे यांच्याबद्दल निगेटिव्ह पॉझिटिव्हिटी नाही. एकनाथ शिंदे यांची ठाणे ही राजधानी आहे. त्यामुळे इकडे ते मस्के यांना कसेही निवडून येणार आहेत. निवडणुकीत आनंद दिघे हा फॅक्टर नाही. मोदी एकनाथ शिंदे त्याचबरोबर राजन विचारे बोल नरेश मस्के यांची तुलना हाच फॅक्टर आहे. आनंद दिघे यांचे पोस्टर पुरते अस्तित्व आहे. दिघे यांना जाऊन वीस वर्षे झाली. आता एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी ही लढाई आहे, असंही अनिल थत्ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुंबईचे आणि एकनाथ शिंदे ठाण्याचे याचा या निवडणुकीत फरक ठाण्यात पडेल. श्रीकांतचे नशीब चांगलं की वैशाली दरेकर तिकडे आली दुसरा उमेदवार असता तर त्या ठिकाणी निवडणूक टफ फाईट झाली असती. वैशाली दरेकर मनसेतून आलेली मनसेवाले गद्दार समजतात. त्यामुळे त्यांना पाडण्याकरिता मनसे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आहेत. दुसऱ्या पक्षातून आल्यानंतर लगेच तिकीट दिलं. त्यामुळे अंतर्गत नाराजगी असल्याने कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरेंची सहानुभूती दरेकर यांना मिळणार नाही, असं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं आहे.
कल्याणमध्ये श्रीकांतला मोठं मतं अधिक्य मिळण्यासाठी वैशाली दरेकर यांना देऊन जागेची ॲडजस्टमेंट केलेली वाटत आहे. दरेकर यांची निवड संजय राऊत यांनी केली. संजय राऊत माझा मित्र… संजय राऊत यांच्या मनात एकनाथ शिंदेंसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. दरेकरांना उमेदवारी ही संजयने प्लॅन केलेली गोष्ट आहे. यासाठी एकनाथ शिंदे त्यांना मदत करतील. कदाचित संजय राऊत जेलमध्ये जाणार नाहीत, असंही अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे.