एकनाथ शिंदे यांच्या बंडाला संजय राऊत यांची खूप मदत होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला संजय राऊत लीड करत होते. वैशाली दरेकर यांना उमेदवारी ही संजयने प्लॅन केलेली गोष्ट आहे. यासाठी एकनाथ शिंदे त्यांना मदत करतील कदाचित संजय राऊत जेलमध्ये जाणार नाही. समोरून नाहीतर संजय राऊत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेला मदत करतो. तर जितेंद्र आव्हाड हे देखील एकनाथ शिंदेला मदत करतात, असं खळबळजनक विधान राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना अनिल थत्ते यांनी हे विधान केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे आहेत. मात्र तिथेही जितेंद्र आव्हाड यांनी अॅक्टिव्हिटी केली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेला मदत करण्याचे कारण अजित पवार गटात गेलेल्या नजीब मुल्ला विधानसभेत उभा राहिला. तर एकनाथ शिंदे यांची आव्हाड यांना मदत होईल, असंही अनिल थत्ते म्हणालेत.
देवेंद्र फडणीस आणि संजय राऊत यांनी मला सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांना बंड करून टाकायला सांगा. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय राऊत यांनी मला सांगितलं. बरं झालं आमचं सरकार गेलं. कारण आमच्या सरकार विरुद्ध लोकांच्या मनात चीड निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व अडचणी आलो असतो, असंही अनिल थत्ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी बंड केला आणि त्या वेळेला दोघांनी सांगितलं की तू तुझी भूमिका घे .मी माझी भूमिका घेतो. यामुळे आमचा भरभरून पराभव झाला असता. मात्र या सर्व गोष्टींमुळे सहानुभूती मिळाली. हे संजय राऊत यांनी स्वतः मला सांगितलंय. ठाकरे सगळ्यांकडून पैसे घ्यायचे व त्यांचे निर्णय मातोश्रीवर त्यांच्या पत्नी घ्यायच्या. हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं. सर्वेच कागदपत्र व ठेकेदारांना डायरेक्ट मातोश्री वरती बोलायला जात होते आणि डायरेक्ट डील करायचे. हा अपमान झाल्यामुळे शिंदे त्यांनी बंड केला, असंही अनिल थत्ते टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.