बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला आहे. आरोपी अक्षय याने पोलिसांच्या गाडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राउंड फायर केले. त्यावेळी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र विरोधकांनी पोलिसांवरच टीका केली हे सर्व षडयंत्र असल्याचं म्हणत अक्षय शिंदचा ठरवून एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. आरोपी अक्षयच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर आरोप करत त्यांनी पैसे घेऊन मुलाला मारल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अतिशय धक्कादायक, आत्मसंरक्षणासाठी एनकाउंटर? API मोरेच्या पायावर गोळ्या झाडल्या, मग अक्षय शिंदेच्या पायावर का गोळ्या मारण्यात आल्या नाहीत? आम्ही वेडे आहोत का? लोकांना मूर्ख समजले आहे का? आता मात्र हद्द झाली. गृह मंत्र्यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे अक्षय शिंदेवर सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच, पण एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात, असं म्हणत अंजली दमानिया यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
अक्षय शिंदेवर सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच, पण एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात.
शाळेच्या प्रशासनाचे गायब लोक कुठे आहेत ? कोतवाल आणि आपटे कुठे आहेत? आज पर्यंत गायब आहे हे पटते का ?
जर हे निर्दोष आहेत तर ते अजून फरार कशामुळे आहेत ?
सत्य लपवले जात आहे का… https://t.co/nc0MREU4GE
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 23, 2024
शाळेच्या प्रशासनाचे गायब लोक कुठे आहेत ? कोतवाल आणि आपटे कुठे आहेत? आज पर्यंत गायब आहे हे पटते का? जर हे निर्दोष आहेत तर ते अजून फरार कशामुळे आहेत? सत्य लपवले जात आहे का? आज सरन्यायाधीश चंद्रचूड मुंबईत आहे त्यांनी ताबडतोब Suo Moto दाखल घेऊन चौकशीचे आदेश दिले पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.