मुंबई: मॉ़डेल उर्फी जावेद हिच्या पेहरावावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फीत जोरदार खडाजंगी सुरू आहे. उर्फीच्या नंगटपणाविरोधात तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ करत आहेत. तर मी असाच पेहराव करेल असं उर्फी म्हणत आहेत. या वादात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेऊन कंगना राणावत, केतकी चितळे आणि अमृता फडणवीस यांच्या पेहराववरून चित्रा वाघ यांना घेरलं होतं. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या वादात उडी घेऊन चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहे.
अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट करून चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या श्री रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ रिट्विट करून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. त्यांनी हा सवाल करताना चित्रा वाघ यांना टॅगही केलं आहे.
प्रिय @ChitraKWagh ताई
भाजप च्या श्री @rameshbidhuri
यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? https://t.co/gcPfnPC4hv— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2023
अंजली दमानिया यांनी त्यानंतर टीव्ही9 मराठीशी संवादही साधला. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. ती बघून दु:ख झालं. मला त्यांच्याबद्दल आदर होता. संजय राठोडांविरोधात त्या लढल्या होत्या.
आज थोडा आदर आहे. राजकारणात कमबॅक करण्याचा किंवा स्व:तचं अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका दमानिया यांनी केली.
ताई, तुम्हाला सांगावं वाटतं तुमचाच पक्ष आहे. तुमच्याच पक्षाने राठोडला मंत्रिपद दिलं असेल तर दुर्देव आहे. काल संध्याकाळी मी जन आक्रोश सभेचा व्हिडीओ पाहिला तेव्हा राहवलं नाही. राजस्थानमध्ये जनआक्रोश महासभा घेण्यात आली. त्यात तरुणी नाचत होत्या. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? असा सवालही त्यांनी केला.
तुम्ही टार्गेटिंग करत आहेत. स्पेसिफिक टार्गेट करत आहात, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. अंधारे यांनी काही उदाहरणे दिली. केतकी चितळे, कंगना राणावत आणि अमृता फडणवीस यांची.
पण केतकी, कंगना आणि अमृता फडणवीस यांच्या कपड्यांबद्दल तुम्ही काही बोलणार नाही. जेव्हा तेव्हा छत्रपतींच्या महाराष्ट्रात असं होऊ देणार नाही असा डायलॉग तुम्ही परत परत मारत होतात, आता यावर तुम्ही काय बोलणार हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे, असंही त्या म्हणाल्या.