मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून (Anvay Naik suicide case) पुन्हा एकदा अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक (Akshata Naik) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच सर्वात पुढे होता, तोच सगळीकडे धावत होता. रश्मीताईंना माझी विनंती आहे की, तो आताही जमीनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट घेत आहे, त्याला एखाद्या माळ्याचे काम तरी मिळून द्या. माझ्या वडिलांनी लावलेली झाडे आहेत, ती आता सुकत आहेत. किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी असा टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सोमय्यांना लगावला आहे. तसेच सोमय्या यांनी जमीन व्यवहारावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जे आरोप केले आहेत, त्या आरोपांना देखील अक्षता नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना अक्षता नाईक म्हणाल्या की, त्याने म्हटले या जमीनीवर ठाकरे परिवाराचे 19 बंगले आहेत. 19 कशाला हा उद्या म्हणेल तिथे हजार बंगले होते. या जमीनीत हिऱ्याची खाण आहे. तो ज्या पद्धतीने या प्रकरणात इंटरेस्ट घेत आहे. त्यावरून असे वाटते की याला वॉचमनची नोकरी द्यावी, निदान तो त्या जमीनीची देखरेख तरी करेल असे अक्षता नाईक यांनी म्हटले आहे. मी किरीट सोमय्या यांनाही सांगते की, तुम्हाला जर एखादी माहिती हवी असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकाराचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूनने उभे राहिचे की? गुन्हेगाराला पाठिशी घालायचे असा सवाल करत अक्षता नाईक यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे. जेव्हा माझ्या पतीने आत्महत्या केली तेव्हा कोणाचं सरकार होतं, तेव्हा नेमकं काय झालं हे सर्वाना माहिती आहे. त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सोमय्या हे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते त्यांनी तातडीने थांबावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा देखील अक्षता नाईक यांनी दिला आहे.
आधी जोशीबुवा भविष्य पाहायचे, आता पाटीलबुवा पाहतात, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला