…म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो, कार्यकर्त्यांबद्दल पाहा काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Mar 09, 2023 | 11:20 PM

राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करत असताना त्यांनी आज भाजप सत्तेवर दिसत असले तरी त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले आहेत.

...म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो, कार्यकर्त्यांबद्दल पाहा काय म्हणाले राज ठाकरे
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचा इतिहास सांगता त्यांनी भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेवरही राज ठाकरे शैलीत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरच सत्तेपासून दूर असलेलं मळभ लवकरच दूर होईल असं सांगत कार्यर्त्यांना त्यांनी वर्धापन दिनादिवशीच महानगरपालिका निवडणुकीत आपली सत्ता असणार असा विश्वास दिला.

राज ठाकर यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची पोचपावती म्हणून डिजिटल पुस्तक प्रकाशित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, गेल्या 17 वर्षात तुम्ही माझ्यासोबत राहून अपार कष्ट घेतले आहात, तसच आजही घेत आहात. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो आहे की तुमच्यासारखे लोक मला मिळाले. त्यामुळेच आजपर्यंत आपण 17 वर्षांची वाटचाल केली असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. आपण केली

यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, पक्ष चालवताना त्रास होतो, मात्र प्रत्येक पक्षाला त्रास होत असतो. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष चालवत असताना त्रास झाला असला तरी तो कार्यकर्त्यांमुळे होत नसतो अशी भावनाही त्यांनी कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करत असताना त्यांनी आज भाजप सत्तेवर दिसत असले तरी त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले आहेत.

कारण 1952 साली जनसंघ हा पक्ष स्थापन झाला होता मात्र त्यावेळी काँग्रेस सोडून दुसरं काहीच नव्हतं, तरीही त्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांनी संघर्ष केला आणि त्यानंतर इतक्या प्रदीर्घ काळानतंर 2014 ला भाजपला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता आपणही सत्तेपासून दूर नाही, हे मळभ दूर होतील असा विश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कधी निवडणूक येईल माहिती नाही मात्र आपल्याला महापालिका आपल्याला जिंकायच्या आहेत असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.