मुंबईः मागील दोन दिवसांपासून निर्भया पथकाला केंद्र सरकारकडून मिळालेल्या वाहनांवरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर निर्भया पथकातील वाहनं इतर विभागामध्ये आणि मंत्र्यांसाठी वापरली गेल्याची टीका करण्यात आली होती. त्या टीकेला उत्तर देताना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निर्भया पथकातील वाहनांचा कसा कोणी वापर केला आहे.
त्याचा तपशील देत त्यांनी आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यानंतर आज सरकारने निर्भया पथकाला वाहनं परत केल्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
आता गाड्या परत केल्या आहेत, तसे आमदारही परत करा असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला याहे. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी पलटवार करत त्यांना जोरदार टोला लगावला आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले ज्या प्रमाणे निर्भया पथकातील वाहने परत केली आहेत.
त्याच प्रमाणे आता आमचे आमदारही परत करा. यावर दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिवा स्वप्न पडत असावीत अशी टीका केली आहे.
शिवसेनेतून आम्ही बंड केले म्हणूनच तुम्ही आता लोकांना आणि आमदारांना भेटत आहात असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे निर्भया पथकातील वाहनांवरून पेटलेल्या राजकारणचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या टीका केल्यानंतर मात्र जोरदार समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, आमच्यामुळे ठाकरे गट आता माणसांमधून आणि लोकांमधून जावू लागला आहे.
या आधी आमदारांनीही भेट ने देणारे आदित्य ठाकरे आता लोकांमध्ये मिसळू लागले आहेत. ते आमच्यामुळेच अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.