पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवे अपडेट्स येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांचं नाव घेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे नार्को टेस्ट करण्यासाठी तयार असतील तर हा विषय इथेच संपला. यात राजकारण होत आहे, हे स्पष्ट झालंय. चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर येईलच. द ग्रेट कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितलं. त्या कोर्टाच्या विदावत्तेला माझा नमस्कार…, असं ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
पोर्शे कार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले. अजित पवारांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली. त्यांचं हे चॅलेंज अदित पवारांनी मान्य केलं आणि नार्को टेस्टसाठी आपण तयार असल्याचं अजित पवार म्हणाले. माझ्या नार्को टेस्टमध्ये काही आलं नागी. तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं, असं अजित पवार म्हणाले. या सगळ्यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ससून रुग्णालयाचे डिन विनायक काळे यांना जर मंत्री महोदय यांनी सांगितलं असेल तर ते काम ते करणार ना. मात्र जबाबदारी मात्र मंत्र्यांची असते ना? ससून आता मात्र बदनाम होत आहे. या हॉस्पिटल ची विश्वासार्हता होतीय. पण ती आता नाही. या हॉस्पिटलमध्ये ड्रग्जचं रॅकेट चालत होतं. त्यामुळे आत्ता सगळी जबाबदारी ही मंत्री महोदय यांची आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
पुणे अपघात प्रकरणात रोज नवीन माहिती येत आहेत. त्यात अपघात दोन गाड्यांची रेस लागली होती आणि त्यात कोण होतं? अशी अनेक माहिती आता समोर येत आहे. अशा मुजोर लोकांत आता माज आला आहे. त्यांना आता भानावर येण गरजेचं आहे. जे आत्ता सुरु आहे त्याला राजकीय वळण लागलं आहे. पण यात राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे ते बाहेर आले पाहिजे, असंही अरविंद सावंत म्हणाले.